शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची सुरक्षा वाढणार

By admin | Updated: May 24, 2017 03:05 IST

रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी अखेर महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी अखेर महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार केईएम, लोकमान्य टिळक, नायर व कूपर या रुग्णालयांत लवकरच आणखी ३२१ खासगी सुरक्षारक्षक तैनात ठेवणार आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. त्यामुळे पालिका रुग्णालय व डॉक्टरांवरही कामाचा ताण वाढतो आहे. डॉक्टर व परिचारिकांची कुमक रुग्णांच्या गर्दीपुढे तोकडी पडत आहे. परिणामी, रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास रुग्णांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रसंग घडतात. मारहाणीच्या अशा काही घटना, डॉक्टरांचे आंदोलन, रुग्णांचे हाल पाहून अखेर पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार सध्या सुरक्षेत असलेल्या ४०० सुरक्षारक्षकांबरोबरच १ मेनंतर आणखी ३२१ खासगी सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. त्यासाठी पालिका या खासगी सुरक्षारक्षकांवर ११ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मांडला आहे. मार्चमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर केईएममध्ये ११२, लोकमान्य टिळक रुग्णालयांत १०४, नायर रुग्णालयांत ७६ व आर. एन. कूपर रुग्णालयांत २९ खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. यात आणखी ३२१ सुरक्षारक्षकांची वाढ केली जाणार आहे. यापूर्वी नियुक्त केलेले चारशे व आता ३२१ असे एकूण ७२१ सुरक्षारक्षक तैनात होणार आहेत. लवकरच केईएम रुग्णालयात ११२ रक्षकांची आणखी नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी चार कोटी नऊ लाख, शीव रुग्णालयातील १०४ रक्षकांसाठी तीन कोटी ८७ लाख, नायर रुग्णालयातील ७६ रक्षकांसाठी दोन कोटी ६४ लाख तर कूपर रुग्णालयातील २९ रक्षकांसाठी ८० लाख अशा एकूण ३२१ सुरक्षारक्षकांसाठी वर्षाला ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.