शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा येथे डॉक्टराने केला तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: January 19, 2015 04:38 IST

नवी मुंबई येथील कामोठा परिसरात राहणाऱ्या एका ५८वर्षीय डॉक्टरने २७वर्षीय तरुणीला नाहक त्रास देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला

तळोजा : नवी मुंबई येथील कामोठा परिसरात राहणाऱ्या एका ५८वर्षीय डॉक्टरने २७वर्षीय तरुणीला नाहक त्रास देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पंकज गोपाळराव पाटील (५८) असे या डॉक्टरचे नाव आहे. कळंबोली परिसरातील एका हॉस्पिटलमधील कर्मचारी असलेल्या या तरुणीला गेल्या १५ दिवसांपासून त्रास होत असल्याचे उघड झाले आहे. कळंबोली येथील एका हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त पाटील आला असता अनोळखी तरुणीसोबत कुणीही नसल्याचे पाहून त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने प्रतिकार केला असता तिला तुझी बदनामी करेन, असे धमकावून तेथून पळ काढला. पीडित तरुणीने आपल्या विश्वासातील माणसांना हा प्रकार सांगितला, त्यानंतर तो तिला व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील चित्रफिती, फोटो, एसएमएस पाठवू लागला. पंकज हे कळंबोली एमजीएम (हाय-वे) येथील दवाखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. पंकजकडून सातत्याने तरुणीला त्रास दिला जात असल्याने तिने दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ‘डॉ. पंकज पाटील याला अटक झालेली होती. आता तो कोर्टातून जामिनावर सुटलेला आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराव मोहिते यांनी दिली.