शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

मिरजेत ट्रकने ठोकरल्याने डॉक्टर दाम्पत्य ठार

By admin | Updated: May 25, 2017 19:50 IST

भरधाव ट्रकने मोटारीला ठोकरल्याने डॉ. शिवाजी विश्वनाथ वडजकर (वय ५१) व सौ. कांचन शिवाजी वडजकर (४६, रा. कर्मवीर चौक, मिरज) या दाम्पत्याचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतमिरज (सांगली), दि. 25 - मिरज-पंढरपूर रस्त्यावर भरधाव ट्रकने मोटारीला ठोकरल्याने डॉ. शिवाजी विश्वनाथ वडजकर (वय ५१) व सौ. कांचन शिवाजी वडजकर (४६, रा. कर्मवीर चौक, मिरज) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे.पशुवैद्यकतज्ज्ञ असलेले डॉ. शिवाजी वडजकर गुरुवारी दुपारी मोटारीतून (क्र. एमएच १० एजी ३३८४) विट्याला गेले होते. विट्यातून मिरजेकडे परत येत असताना मिरजेत बालाजी कार्यालयासमोर ते आले असता, भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. एमपी ०९ एचएच ५११८) त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात कांचन वडजकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या डॉ. शिवाजी वडजकर यांना तातडीने मिरज शासकीय रूग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचाही तेथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला.अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकच्या धडकेने मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन मोटारीत रक्ताचे थाररोळे पसरले होते. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन डॉ. वडजकर दाम्पत्यास शासकीय रूग्णालयात हलविले.त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मिरज परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली. हा ट्रक कोल्हापूरहून आटपाडीकडे जात असताना ट्रकने वडजकर यांच्या मोटारीला ठोकरले. अपघातप्रकरणी ट्रकचालक हलकुराम शेन (४५, रा. शिवपुरी, मध्य प्रदेश) यास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पशुवैद्यक तज्ज्ञमूळचे नांदेड येथील डॉ. शिवाजी वडजकर पोल्ट्री व्यवसायातील पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून मिरजेत काम करीत होते. डॉ. वडजकर यांनी काही काळ विटा येथे व नंतर मिरजेत बाळकृष्ण ग्रुपमध्ये पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून काम केले होते. पोल्ट्री व्यवसाय सल्लागार म्हणून काम करणारे डॉ. वडजकर ह्यपोल्ट्री न्यूजह्ण या नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचा मुलगा बारावीत, तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावी नांदेड येथे परत जाण्याची डॉ. वडजकर यांची इच्छा होती. पण गुरुवारी या दाम्पत्याचा मृत्यू झाला.