शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

डॉक्टर दाम्पत्य किडनी रॅकेटचे म्होरके

By admin | Updated: December 4, 2015 00:53 IST

किडनी तस्करीच्या रॅकेटमधील दलालांचे म्होरके यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याची माहिती गुरुवारी उजेडात आली. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी अकोला

- सचिन राऊत,  अकोलाकिडनी तस्करीच्या रॅकेटमधील दलालांचे म्होरके यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याची माहिती गुरुवारी उजेडात आली. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी अकोला पोलिसांची दोन पथके रवाना झाली. डॉ. मंगला व सुहास श्रोत्री यांनी यवतमाळमधील हॉस्पिटल बंद करून नागपुरातून हा धंदा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.शिवाजीनगर येथील आनंद भगवान जाधव (३०) याने संतोष शंकर गवळी याला व्याजाने २० हजार रुपये दिले होते. रक्कम थकल्याने आनंदने गवळीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन किडनी काढण्यास तयार केले. त्यानंतर या रॅकेटमधील देवेंद्र शिरसाट याने गवळीचा लागलीच पासपोर्ट काढून, त्याची सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर येथील रहिवासी शिवाजी कोळी याच्याशी भेट घालून दिली. कोळी याने गवळीला श्रोत्री दाम्पत्याकडे नेले. त्यांनी गवळीची आधी यवतमाळमधील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. त्यानंतर त्यांनी नागपुरातील एका डॉक्टरच्या मदतीने संतोष गवळी याच्या नागपूरमध्ये पुन्हा तपासण्या केल्या. श्रोत्री दाम्पत्य गवळीला घेऊन श्रीलंकेत गेले. तिथे कोलंबो शहरात १० दिवस मुक्काम केल्यानंतर त्याची किडनी काढण्यात आली. त्यासाठी गवळीला ४ लाख रुपये देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात त्याच्या हाती केवळ ३ लाख रुपये देण्यात आले.‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, पोलिसांनी बुधवारी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिरसाट व जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली. त्यांच्या चौकशीत आणखी धागेदोरे लागल्यावर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून, अकोला व सांगलीतील दलालांचा म्होरक्या हा यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याचे उघड झाले आहे. आणखी नागरिकांची किडनी काढून तस्करी करण्यात आल्याचे आता समोर येत आहे. गुरुवारी पीडित साक्षीदारांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.दोन्ही संतोषची होणार वैद्यकीय तपासणीपीडित संतोष कोल्हटकर व संतोष गवळी या दोघांची स्थानिक गुन्हे शाखा लवकरच वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.यांच्या काढल्या किडनीश्रोत्री दाम्पत्याने ५ जणांच्या किडनीचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यात संतोष गवळी, संतोष कोल्हटकर, शांताबाई खरात, देवा कोमलकर व अमर नामक युवकाचा समावेश आहे. शांताबाईला ४ लाखांपैकी २ लाख रुपये देण्यात आले असून, संतोष गवळी व कोल्हटकर यांना ४पैकी ३ लाख रुपये देण्यात आले. देवा व अमर यांना किती रुपये देण्यात आले, हे समजू शकले नाही.तिघांची नावे दिली होती ‘लोकमत’नेशांताबाई, देवा आणि अमर या तीन पीडितांची नावे सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेऊन, या प्रकरणी गुन्हा दाखल केला.यवतमाळमधील हॉस्पिटल३ वर्षांपूर्वी बंदडॉ. मंगला व डॉ. सुहास श्रोत्री यांचे यवतमाळ येथील टिळकवाडीमध्ये श्रोत्री हॉस्पिटल होते; मात्र ३ वर्षांपूर्वी हॉस्पिटल बंद करून, ते नागपूर येथील मोठ्या जावयाकडे वास्तव्यास गेले. येथून त्यांनी किडनी तस्करीचे रॅकेटच चालविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये नागपूर येथील एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे समजते.महत्त्वाचे दस्तऐवज पोलिसांच्या हाती आले आहेत. यामध्ये काही डॉक्टरांचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार आहे. रॅकेटच्या म्होरक्यासह काही बड्या हस्तींना बेड्या ठोकण्यात येतील. - चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक, अकोला