शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

..तर डॉक्टरांचे जेलभरो आंदोलन

By admin | Updated: July 7, 2014 00:51 IST

‘मॅग्मो’च्या डॉक्टरांकडून ‘मेस्मा’च्या आदेशाची होळी

अकोला: मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या विविध मागण्या २0११ मध्येच शासनदरबारी मंजूर करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने संघटनेच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या डॉक्टरांना राज्य शासनाने मेस्मा लावण्याचे आदेश दिले असून, अकोल्यातील डॉक्टरांनी या आदेशाची रविवारी दुपारी होळी केली. यासोबतच शासनाने फौजदारी कारवाई केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या नवीन कुठल्याही मागण्या नसून, ज्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, यासाठी मॅग्मो संघटनेच्यावतीने डॉक्टर्स डे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मॅग्मो संघटनेचे डॉक्टर जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनास बसले असून, त्यांना आ.डॉ. रणजित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेट दिली. डॉक्टरांचे मुंबईतील आझाद मैदानावरदेखील आंदोलन सुरू असून, त्या ठिकाणच्या डॉक्टरांवर रविवारी सायंकाळपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र मेस्मा लावण्याचे आदेश या डॉक्टरांना प्राप्त झाले असून, अकोल्यातील डॉक्टरांनी या आदेशाची होळी केली. यासोबतच फौजदारी कारवाईसही तयार असून, अशा कारवाईचा बडगा शासनाने उगारल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचाही इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात डॉ. विजय जाधव, डॉ. प्रमोद रक्षमवार, डॉ. उज्ज्वला पाटील, डॉ. उमाकांत गरड, डॉ. अश्‍विन पाटील, डॉ. राजेश गायकवाड , डॉ. भावना हाडोळे यांच्यासह मॅग्मो संघटनेचे डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत

. ** सीएस, डीएचओ व डीडी संघटनेचा पाठिंबा

मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांनी मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास आरोग्य उपसंचालक संघटना, जिल्हा शल्य चिकित्सक संघटना व जिल्हा आरोग्य अधिकारी या तीनही संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव यांनी दिली. या तीनही संघटना या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून, त्यामुळे हा बेमुदत संप चिघळण्याची शक्यता आहे.

** मेस्मा कार्यवाही न करण्याची मागणी

अकोला: आंदोलनात सहभागी वैद्यकीय अधिकार्‍यांवर ह्यमेस्माह्ण कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटनेचे (मॅग्मो-आयुर्वेद) डॉ. विजय जाधव यांनी रविवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभगाच्या प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन, तोडगा काढावा, असेही डॉ. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.