शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: June 28, 2017 01:40 IST

रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप करत संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करण्यात यावे, अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे.पुण्याच्या हडपसर येथील संजीवनी रुग्णालयात आरती कदम (३०) यांना आॅगस्ट २०१६ मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांचे पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी त्यांना ‘पेनकिलर’ इंजेक्शन दिले. मात्र त्या इंजेक्शनला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला त्यांच्या पतीला दिला. यादरम्यान आरती यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरती यांचे पती अभिजित कदम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात डॉ. उत्तम ताम्हाणे, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. संजय लाडकट, डॉ. रुपाली गुजराथी व परिचारिका मनीषा मांडलिक व सविता भांडेकर यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून सर्वांवर आयपीसी कलम ३०४ (भाग-२) (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदवला व त्यानंतर दोषारोपपत्रही दाखल केले.मात्र पोलिसांनी चुकीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी डॉक्टरांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यांना कोणीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.