शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना दिलासा नाही - उच्च न्यायालय

By admin | Updated: April 16, 2016 02:42 IST

मूल होत नसलेल्या दाम्पत्याला कृत्रिमरीत्या गर्भधारणेची हमी देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा परवाना निलंबित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : मूल होत नसलेल्या दाम्पत्याला कृत्रिमरीत्या गर्भधारणेची हमी देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा परवाना निलंबित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या दाम्पत्याचे आयव्हीएफ क्लिनिक दक्षिण मुंबईमध्ये आहे. डॉ. अनिरुद्ध मालपानी व त्यांची पत्नी अंजली गर्भधारणा न होणाऱ्या दाम्पत्यांना कृत्रिमरीत्या गर्भधारणेची हमी देत आणि न झाल्यास पैसे परत करण्याचे आश्वासनही दाम्पत्यांना देत. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली होती. त्यांच्या या जाहिरातीविरुद्ध अ‍ॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल आॅफ इंडियाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियात (एमसीआय) तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एमसीआयने डॉक्टर दाम्पत्याचा तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला. तसेच परवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराही एमसीएने त्यांना दिला.एमसीएच्या या निर्णयाला डॉक्टर दाम्पत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिका प्रलंबित असेपर्यंत परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉक्टरांनी याचिकेत केली आहे. या बाबतीत आम्ही तज्ज्ञ नाही. त्यामुळे आम्ही या ‘संवेदनशील आणि नाजूक’ विषयावर काही बोलू शकत नाही. मूल नसलेल्या दाम्पत्यांच्या भावनांशी डॉक्टरांनी खेळू नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने डॉक्टरांना दिलासा देण्यास नकार देत एमसीआयला २९ एप्रिलपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) $$्निपरवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराआयव्हीएफ क्लिनिकच्या जाहिरातीविरुद्ध अ‍ॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल आॅफ इंडियाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियात (एमसीआय) तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एमसीआयने डॉक्टर दाम्पत्याचा तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला. तसेच परवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराही एमसीएने त्यांना दिला.