शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा

By admin | Updated: August 4, 2016 02:29 IST

बोगस डॉक्टरांच्या नावाखाली नामांकित डॉक्टरांचा छळ होत असल्यााबद्दल वसई विरार शहरातले डॉक्टर्स संतप्त झाले आहेत.

वसई : बोगस डॉक्टरांच्या नावाखाली नामांकित डॉक्टरांचा छळ होत असल्यााबद्दल वसई विरार शहरातले डॉक्टर्स संतप्त झाले आहेत. त्यातच नालासोपाऱ्यातील एका डॉक्टरला अटक झाल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांनी वसई विरार पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी पालिकेच्या आरोग खात्याच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी आयुक्तांपुढे केल्या.वसईत गेल्या काही दिवसांपासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यानिमित्ताने सर्व डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यामुळे नामांकित आणि मान्यताप्राप्त डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यातच नालासोपाऱ्यातील एका बीएचएमएस डॉक्टरला अटक करून त्याला पोलीस कोठडीत डांबण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी मंगळवारी भर पावसात पालिकेवर मोर्चा काढला. डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणे किंवा त्यांना अटक करण्याचे अधिकार पालिकेच्या आरोग्य विभागाला किंवा पोलिसांना नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)आम्ही बोगस डॉक्टरांवरील कारवाईचे स्वागत करतो. परंतु त्या कारवाईच्या नावाखाली आमचा छळ केला जातो. सक्तीची नोंदणी क़रणे, बायोवेस्टच्या नावाखाली पैसे गोळा करणे,एमपीबीसी प्रमाणपत्रांची सक्ती करणे आदी प्रकार पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जातात असा आरोप डॉ. आशा मुंडे यावेळी केला. आम्हाला गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी सात दिवसात चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त सतीश लोखंडे यांनी यावेळी मोर्चेकरांना दिले.