शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात दोन हजार रुपयांसाठी डॉक्टरचा खून

By admin | Updated: November 2, 2016 18:51 IST

येथील डॉक्टर सतीश शांताराम देऊलकर (वय ५९) यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दोघांना अटक केली. संशयित आरोपी उत्तम

ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि. 02 -  येथील डॉक्टर सतीश शांताराम देऊलकर (वय ५९) यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दोघांना अटक केली. संशयित आरोपी उत्तम अण्णा देसाई (३९), तानाजी आनंदा थोरात (२६, दोघे, रा. घरपण, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. डॉ. देऊलकर यांनी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते. आपली फसवणूक केल्याच्या रागापोटी देऊलकर यांचा खून केल्याची उत्तम देसाई याने कबुली दिली आहे, अशी माहिती निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.  
डॉ. देऊलकर गोव्याला जातो म्हणून दि. २८ आॅक्टोबरच्या रात्री घरातून बाहेर पडले. त्यानंतर दुस-या दिवशी शनिवारी (दि. २९) कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाटपन्हाळा येथील कासारी नदीच्या कोरड्या पात्रात त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. कोल्हापुरातील डॉक्टरचा पाटपन्हाळा येथे खून झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. हा खून पैशातून झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने कळे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपास करीत होते. पोलिस देऊलकर यांचे उठणे-बसणे कोठे असते, त्यांचा मित्रपरिवार कोण आहे, त्यांचा वाद कोणाशी होता, त्यांनी आर्थिक व्यवहार कोणाशी केला होता यासंबंधी माहिती घेत असताना खब-याकडून पोलिस निरीक्षक मोहिते यांना उत्तम देसाई याने साथीदार तानाजी थोरात याच्या मदतीने देऊलकर यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 
 
डॉ. देऊलकर हे बी. एच. एम. एस. पदवी प्राप्त केल्यानंतर आॅईल अ‍ॅँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओ.एन.जी.सी.) मध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करीत होते. त्यांची व संशयितांची एक महिन्यापूर्वी लक्ष्मीपुरीत डॉ. भूपाळी यांच्या रुग्णालया शेजारील चहाच्या टपरीजवळ ओळख झाली होती. त्यावेळी देऊलकर यांनी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो असे सांगून उत्तम देसाई याच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते. त्यानंतर नोकरीच्या आमिषाने त्यांच्याकडून दारू व जेवणासाठी पैसे मागून घेतले होते. पैसे देऊनही नोकरी लावली नाही; त्यामुळे देऊलकर ही फसवणूक करणारी व्यक्ती आहे, याची त्यांना खात्री झाली. त्यांनी पैशांची मागणी केली असता देऊलकर हे टाळाटाळ करीत होते. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली.  दि. २८ च्या रात्री सीपीआर येथून संशयितांनी कार (एमएच ०१-एई ३६५२) मधून देऊलकर यांना केर्ली (ता. करवीर) येथे नेले. या ठिकाणी दारू पाजून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व मोबाईल काढून घेतला. देऊलकर हे या प्रकाराची माहिती पोलिसांना देतील या भीतीने ते मलकापूर, अणुस्कुरामार्गे पाटपन्हाळा गावाजवळील कासारी नदीवरील पुलाखाली आले. येथील कोरड्या पात्रामध्ये त्यांना मारहाण करून, डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. तपास पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक इलियास सय्यद, उपनिरीक्षक युवराज आठरे, कॉन्स्टेबल सुनील कवळेकर, सुनील इंगवले, शिवाजी खोराटे, सुरेश चव्हाण, राजेंद्र हांडे, श्रीकांत पाटील, संजय हुंबे, संजय काशीद, सुजय दावणे, राजेंद्र निगडे यांचा समावेश होता.
 
मोबाईलवर आरोपींचा सुगावा
आरोपींनी डॉ. देऊलकर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मोबाईल आपल्यासोबत ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स तपासले असता उत्तम देसाई याचे वारंवार कॉल झाल्याचे दिसून आले. दि. २८ रोजी देऊलकर हे बेपत्ता झाले त्यावेळी शेवटचा कॉल देसाई याचाच होता. यावरून त्यांनीच खून केल्याचा संशय बळावला होता. तसेच त्या दोघांची माहिती खब-यानेही दिली होती.