शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टर होणार कामावर हजर

By admin | Updated: March 24, 2017 16:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयार दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - उद्या सकाळी 8 वाजता सगळ्या डॉक्टरांनी कामावर हजर व्हावं, अन्यथा सरकारवर त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा हायकोर्टाने दिल्यावर मार्डने नमतं घेतलं आहे. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने डॉक्टरांना उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचे सांगितले. तसेच जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार वा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते असेही मार्डने मान्य केले आहे.
हायकोर्ट तसेच मुख्यमंत्री दोघांनीही संपकरी डॉक्टरांविरोधात ताठ भूमिका घेतल्यानंतर डॉक्टरांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयारी दाखवली होती. सोबतच आपण मार्डलाही संप मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना झापलं असून 'डॉक्टरांनी आडमुठेपणाची भुमिका सोडावी अथवा त्यांचं संरक्षण करू शकणार नाही. तसंच डॉक्टरांच्या बाबतीत निर्देश बदलावे लागतील', असं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं .  
मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला 3 वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता, त्यानंतरही प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास सरकार कारवाई करण्यास मोकळं असेल असं आज सकाळी स्पष्ट केलं होतं. सरकारने कारवाई केल्यास आमची काही हरकत नसणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं. तसेच संप सुरु ठेवल्यास न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही न्यायालयाने सांगितलं होतं. या सगळ्याचा परिणाम होत अखेर मार्डने सगळे डॉक्टर उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर होतील असं लिहून दिलं आहे. तसेच, जे डॉक्टर कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तरी त्याची जबाबदारी त्या डॉक्टरांवरच असेल, मार्डवर नसेल असंही संघटनेच्या सचिवांनी नमूद केलं आहे.
 
जर निवासी डॉक्टर कामावर येत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा असा निदर्शे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांच्या संपामुळे सायन रुग्णालयात 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या वकिलाने न्यायालयात दिली आहे. या मुद्यावर तीन वाजता होणा-या सुनावणीत चर्चा केली जाणार आहे.