शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केईएम रुग्णालयात डॉक्टरांना सळईने मारहाण, संतप्त डॉक्टर संपावर

By admin | Updated: September 25, 2015 12:10 IST

केईएम रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांना सळईने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून संतप्त डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - केईएम रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांना सळईने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून संतप्त डॉक्टर आज सकाळपासून कामबंद आंदोलनावर आहेत. डॉ. सुहास, डॉ. कुशाल व डॉ. पुनित यांना ५-६ इसमांनी लोखंडी स्टूल, सळई व लाकडाने मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनेंतर मार्डने बेमुदत राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. 
काल रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णालयात दोन वर्षांचे एक डेंग्यूग्रस्त बाळ आणण्यात आले, त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. मात्र आयसीयूमध्ये दाखल करण्यास जागा नसून त्या बाळाची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यावर नातेवाईकांनी बाळाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्याचा आग्रह केला.  अखेर नातेवाईकांच्या काही महत्वाच्या फॉर्म्सवर सह्या घेऊन डॉक्टरांनी बाळाला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बाळाची प्रकृती खूपच बिघडली हे पाहून बाळाचे वडील व ५-६ नातेवाईकांनी  सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली व त्यानंतर डॉक्टरांवरच हल्ला चढवला. त्यांना सळई, स्टूलच्या सहाय्याने बेदम मारहाण केली ज्यात तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतापलेल्या डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन केले असून मार्ड संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डॉक्टर हे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी असता, त्यांच्या जीवाचे बरं-वाईट करण्यासाठी नव्हे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्याचं कामं तुमचा जीव वाचवणं हे असतं त्यालाच मारहाण करणं हे कुठल्या तत्वात बसतं असा सवाल विचारात डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला आहे. याआधीही मारहाणीच्या अशा घटना घडल्या असून त्यासाठी जबाबदार असलेले लोक अद्यापही मोकाट फिरत आहेत, असे सांगत संपूर्ण सुरक्षा मिळेपर्यंत कामावर परतणार नसल्याची ठाम भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.