शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना जाहिरातबाजीपासून रोखणार

By admin | Updated: March 28, 2016 02:13 IST

डॉक्टरांनी स्वत:च्या फोटोसह जाहिरातबाजी करू नये, असा संकेत आहे. पण तरीही सध्या अनेकदा टीव्हीवर, वर्तमानपत्रांतून वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या आणि अन्य डॉक्टरां

मुंबई : डॉक्टरांनी स्वत:च्या फोटोसह जाहिरातबाजी करू नये, असा संकेत आहे. पण तरीही सध्या अनेकदा टीव्हीवर, वर्तमानपत्रांतून वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या आणि अन्य डॉक्टरांच्या जाहिराती झळकताना दिसतात. हे लक्षात घेऊनच डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय आता ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) गेल्या काही दिवसांत दोन डॉक्टरांवर जाहिरातबाजी केल्यामुळे कारवाईचा बडगा उचलला. या दोघा डॉक्टरांचे तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन अ‍ॅक्ट २००२ नुसार, डॉक्टर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रुग्णाला त्यांच्याकडे येण्यासाठी प्रभावित करू शकत नाहीत. त्याबरोबर आपल्या उपचार पद्धतीविषयी डॉक्टर बडेजाव मिरवू शकत नाहीत. चमत्कारिक उपाय आणि औषधांच्या जाहिराती करण्यावरही बंदी आहे. तरीही अशाप्रकारच्या जाहिराती सर्रास केल्या जातात. प्रॅक्टिस सुरू करताना किंवा प्रॅक्टिस बदलताना, नवीन प्रॅक्टिस सुरू करताना फीसंदर्भात डॉक्टर जाहिरात देऊ शकतात. पण या जाहिरातींमध्ये डॉक्टरचा फोटो नसावा. नवीन रुग्णालयांच्या जाहिरातीतही डॉक्टरचा फोटो नसावा. क्लिनिकचा पत्ता दर्शवणारी जाहिरात औषधांच्या दुकानांवर लावू नये, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. एस.एस. अग्रवाल यांनी सांगितले. डॉक्टरांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, त्यांच्या हक्कांविषयी, त्यांच्या जवाबदाऱ्यांविषयी त्यांना माहिती मिळावी म्हणून आयएमए नेहमीच कार्यरत आहे. म्हणूनच जाहिरातबाजी विषयावर जनजागृती करण्यात येत असल्याचेही डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)