शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर आॅक्सिजनवर!

By admin | Updated: July 7, 2014 01:12 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी २० अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माअंतर्गत

८९ डॉक्टरांवर कारवाई : मॅग्मो’चे असहकार आंदोलन नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी २० अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माअंतर्गत त्यांची सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाने आतापर्यंत ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरी बसविले आहे. उद्या सोमवारी आंदोलनकर्त्यांवर मेस्मा लावून अटक करण्याची दाट शक्यता आहे. कालपर्यंत ‘मेस्मा’ची नोटीस बजावणारे आरोग्य विभागाच्या वर्ग ‘अ’चे अधिकारीही सोमवारपासून या आंदोलनात सहभागी होणार आहे. ‘मॅग्मो’च्या नेतृत्वात मंगळवारपासून सुरू झालेले हे आंदोलन आता पूर्णत: चिघळले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा ठप्प पडली आहे. रुग्ण मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयाकडे वळल्याने ही तीनही रुग्णालये फुल्ल झाली आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवर पडला आहे. प्रसूती आणि शवविच्छेदन हे विभाग प्रभावित झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नावाडे यांनी मेस्मा अंतर्गत गुरुवारपासून कारवाईची नोटीस बजावणे सुरू केले होते. परंतु सोमवारपासून हे तीनही अधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. रविवारी डॉ. नावाडे आणि डॉ. सवई यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यामुळे उद्यापासून हे आंदोलन वेगळे वळण घेण्याची स्थिती आहे.आंदोलनाच्या आज सहाव्या दिवशी एमबीबीएसचे (गट अ) चार आणि बीएमएसचे (गट ब ) १६ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. शनिवारी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. आतापर्यंत ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. हरीष महंत, डॉ. सोनाली किरडे,डॉ. ईरफान अहमद, डॉ. ममता सोनसरे, डॉ. हर्षवर्धन मानेकर यांच्यासह अनेकांनी केले.नोटीस बजावणारेच आंदोलनातआंदोलनात सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माची नोटीस बजावणारे आरोग्य विभागाचे वर्ग ‘अ’चे अधिकारीच सोमवारपासून आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यांच्या विविध संघटनांनी ‘मॅग्मो’च्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात आरोग्य विभागाचे उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त सहसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, विशेषतज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)रुग्णच नाहीतर मृतदेहाचेही हालमॅग्मोच्या या आंदोलनाचा फटका रुग्णांसोबतच शवविच्छेदनसाठी येणाऱ्या मृतदेहाला बसत आहे. रविवारी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईक मृतदेह घेऊन आले. परंतु येथील इंटर्न डॉक्टरांनी नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयाकडे बोट दाखविले. याला घेऊन नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे समजते. शवविच्छेदन होत नसेल तर उघडे कशाला ठेवता, असा प्रश्नही नातेवाईकांनी केला.अटकेसाठी ‘मॅग्मो’ तयाररविवारी दुपारी ३ वाजता मेस्माअंतर्गत आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. सदर पोलीस ठाण्यातून काही पोलिसांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलनामध्ये सहभागी डॉक्टरांची यादीही तयार करून घेतली होती. परंतु नंतर ते आलेच नाही. आम्ही स्वत: पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी दाखविली. परंतु पोलिसांनी याला नकार दिला. आम्ही कधीही स्वत:ला अटक करून घेण्यास तयार आहोत, असे मॅग्मोचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड म्हणाले.