शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येचे गुढ उकलले

By admin | Updated: December 27, 2015 10:38 IST

इस्लामपूर शहरात झालेल्या डॉक्टर दांम्पत्याच्या हत्या प्रकरणात सांगली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
सांगली, दि. २७ - मागच्या आठवडयात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर  डॉक्टर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने हादरले होते. या प्रकरणात सांगली पोलिसांनी नर्स सीमा यादव आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली आहे. मागच्या रविवारी डॉ. प्रकाश कुलकर्णी (६५) आणि त्यांच्या पत्नी अरुणा कुलकर्णी (५८) रहात्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. 
अज्ञात मारेक-यांनी धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा त्यांना कुलकर्णी दाम्पत्याचे व्यक्तीगत पातळीवर कुणाबरोबरही वैर, शत्रूत्वाचे संबंध नसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचा जवळच्या माणसांवर संशय होता. सीमा यादव डॉ. कुलकर्णींच्या क्लिनकमध्ये नोकरीला होती. तिची मागच्या तीन-चार दिवसांपासून कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी तिला आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली. 
या हत्येमध्ये आणखी एक तिस-या व्यक्तीचाही सहभाग आहे. पोलिसांनी या तपासाबाबत सुरुवातीपासून गुप्तता बाळगली होती. हे दुहेरी हत्याकांड नेमके कोणत्या उद्देशाने झाले ते अद्यापही पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. डॉ. प्रकाश कुलकर्णी फिजिशिअन तर, त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ञ होत्या.