शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना ओलीस धरणारे डॉक्टर असंवेदनशील - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 25, 2017 00:32 IST

हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत

मुंबई : हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत काय फरक आहे. जनतेच्या करांच्या पैशातून तुम्ही शिकलात, पैसाही घेता. त्यांना ओलीस धरण्याचा तुम्ही करीत असलेला प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्डच्या संपकरी डॉक्टरांना ठणकावले. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याच्या मुद्यावरून भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी गदारोळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपावर निवेदन करताना संपकऱ्यांना अक्षरश: खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दिली. तातडीने उपाययोजनादेखील सुरू केल्या. या उपाययोजना १५ दिवसांच्या अमलात आल्या नाहीत तर मी वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. कामावर परत या अशी विनंती आम्ही त्यांना वारंवार केली. त्यांच्या हातापायाही पडलो. अजून काय हवे आहे? अजून किती संयम आम्ही दाखवायचा? या संपाबद्दल सभागृहाच्या आणि राज्यातील जनतेच्याही भावना तीव्र आहेत. डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडतील पण सरकार तसे होऊ देणार नाही. राज्य शासनाने डॉक्टरांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. सर्व प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात लेखी दिले. उच्च न्यायालयाने देखील संप मागे घेण्याबात निर्णय दिला. तरी देखील डॉक्टर कामावर रु जू झाले नाहीत. त्यांनी घेतलेल्या वैद्यकीय शपथेचा विसर पडलेला दिसतो. ज्या करदात्यांच्या पैशातून डॉक्टरांना शिक्षण दिले जाते त्याच सामान्य माणसाला उपचाराविना मरणासन्न अवस्थेत सोडून देणे कितपत योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर शासनाचे, उच्च न्यायालयाचे ऐकायला तयार नाही. संधीचा फायदा घेऊन आपल्या मागण्या रेटण्याचे काम सुरु आहे. हे खपून घेतले जाणार नाही.जाणीवपूर्वक उपचार नाकारले जात असतील तर डॉक्टरांना जबाबदार का धरले जाऊ नये, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखविली नाही तर राज्य शासन हातावर हात धरु न बसणार नाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मुख्यमंत्र्यांच्याच निवेदनाचे भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. समाजाने डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. मात्र डॉक्टरांची ही असंवेदनशीलता पाहून त्यांना दानवाची उपमा द्यायला नागरिकांना बाध्य व्हावे लागेल, अशी परिस्थिती डॉक्टरच निर्माण करीत आहेत.