शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
3
लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली
4
केवळ टेकच नाही तर HR प्रोफेशनल्सचीही नोकरी खाऊ लागला AI; IBM नं ८००० कर्मचाऱ्यांना काढलं
5
कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...
6
आता घरबसल्या होईल मालमत्ता नोंदणी! ११७ वर्षांचा जुना कायदा होणार रद्द, काय असणार नवीन नियम?
7
“पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल
8
पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
9
Video: दिग्वेश राठीने भरमैदानात केलं असं काही... विराट कोहली, ऋषभ पंत दोघांनाही हसू अनावर
10
निळ्या ड्रमचा धसका! बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं बायकोचं लग्न, नवऱ्याने का घेतला असा निर्णय?
11
₹७० लाख कोटींच्या इंडस्ट्रीवर नजर, अंबानींच्या हाती लागला 'अलादीन'चा जादूई दिवा; रॅाकेट बनला शेअर
12
'AI' नोकरी खाणार की सोबत काम करणार? TCS चा 'भविष्याचा' मास्टरप्लॅन समोर; 'या' ४ योजनांवर काम सुरू
13
धक्कादायक! बॉयफ्रेंडकरवी पोटच्या मुलीवर बलात्कार, पुरावे मिटवण्यासाठी आईनं धावत्या ट्रकसमोर फेकलं लेकीचं शरीर
14
Mumbai Rain History: मुंबईत पावसाने खरंच कहर केला! १०० वर्षांनंतर पहिल्यांदाच पडला असा पाऊस
15
“आम्ही अजून किती वाट पाहायची? भारतरत्न देण्यातच वीर सावरकरांचा खरा सन्मान”: संजय राऊत
16
Astrology: व्यवसाय करावा तो 'या' राशीच्या लोकांनी; मिळतो बक्कळ पैसा, प्रसिद्धी आणि अमाप यश!
17
मे महिनाभर धो-धो कोसळला! पावसा, जूनमध्ये तरी उसंत घेशील का? IMD चा अंदाज आला... 
18
रिटायरमेंटशी निगडित नियमांमध्ये मोठे बदल, सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणं आवश्यक
19
स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी, रोहिंग्यांकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव, दिले असे आदेश 

‘हिरानंदानी’चे डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 19, 2016 05:23 IST

किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई : किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात असून, या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयकाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत या साखळीचा उलगडा होणार आहे.हिरानंदानी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेट उघडकीस येताच, मुंबईतील इतरही रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत समन्वयक नीलेश कांबळेसह या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली. नीलेशकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याला रविवारी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सोमवारी गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांसोबत या प्रकरणी पवई पोलिसांच्या तपास पथकासोबत बैठक झाली. पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह तपास अधिकारी या वेळी उपस्थित होते.कांबळे यामागील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. मात्र, वरिष्ठ डॉक्टरांना हाताशी धरून त्याने हा प्रताप केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कांबळेमार्फत आतापर्यंत ३५ प्रत्यारोपण झाल्याची माहिती समोर येत आहे. ३५ रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणमुंबईतील एकूण ३५ रुग्णालयांनी अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. यात महापालिका, शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. >रुग्णालयात प्रत्यारोपण समन्वयकाचे काय काम असते?मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ नुसार कोणत्याही रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपण करण्याची परवानगी हवी असल्यास, त्या रुग्णालयात ‘अवयव प्रत्यारोपण समन्वयक’ नेमणे आवश्यक आहे. समन्वयक निवडल्यानंतर प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली जाते. रुग्णालयात दोन प्रकारे अवयव प्रत्यारोपण केले जाते.एक म्हणजे, मेंदू मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीचे अवयव त्याच्या नातेवाईकाच्या संमतीने काढले जातात आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना अवयव दिले जातात.तर दुसऱ्या पद्धतीत रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव घेतले जातात. या दोन्ही पद्धतीत समन्वयक महत्त्वाचा असतो. कारण रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम हा समन्वयक करत असतो. रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, डॉक्टरांशी संवाद साधणे, कागदपत्रांची पूर्तता करणे ही प्राथमिक पातळीवरची कामे हा समन्वयक करत असतो. त्याचबरोबर, ‘लाइव्ह ट्रान्सप्लांट’मध्ये कागदपत्रांची पूर्तता, त्याची फेरतपासणीचे कामही समन्वयक करतो.