शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याची गळा चिरून हत्या

By admin | Updated: December 21, 2015 09:30 IST

डॉक्टर दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात रविवारी सकाळी उघडकीस आली.

सांगली : डॉक्टर दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात रविवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (६५) आणि डॉ. अरुणा (५८) असे मृत दाम्पत्याचे नाव असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.डॉ. कुलकर्णी यांचे ‘धरित्री क्लिनिक’ नावाचे रुग्णालय आहे. याच इमारतीच्या वरील भागात त्यांचे निवासस्थान असून, घरी फरशी बसवण्याचे काम सुरू होते. परिचारिका सीमा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजता प्रसुतीसाठी एक रुग्ण आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या मोबाइलवर, शयनगृहातील दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.रविवारी सकाळी स्मिता यादव या पुन्हा ड्युटीवर आल्यावर दुधाची पिशवी, वृत्तपत्र खालीच पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वर जाऊन दारावरची बेल वाजवली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी रुग्णालयातील इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी धक्का देऊन दरवाजा उघडल्यावर, अरुणा या स्वयंपाकगृहात, तर प्रकाश कुलकर्णी हे शयनगृहातील पलंगाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. पहिल्या मजल्यावरील दरवाजाची जाळी कापून आत आलेल्या हल्लेखोरांनी प्रकाश यांच्यावर १७ वार केल्याचे दिसत होते, तर डॉ. अरुणा यांच्या गळ्यावर तीन वार करण्यात आले होते. रक्ताने माखलेल्या पावलांनीच हल्लेखोरांनी पाठीमागील गच्चीवरून उड्या मारून शेतातून पलायन केले. शनिवारी रात्री १० पूर्वीच या डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाली असून, हल्लेखोर हे माहीतगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कुलकर्णी दाम्पत्याच्या पश्चात मुलगा डॉ. आदित्य व स्नूषा डॉ. रचना असा परिवार आहे. डॉ. आदित्य हा बेळगाव येथे डी. एम. न्युरोचे शिक्षण घेत आहे, तर त्याची डॉ. रचना ही बेळगाव के.एल.ई. येथे नोकरीस आहे. (वार्ताहर)या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी वैद्यकीय व्यावसायिकांनी केली आहे. सोमवारी या हत्येच्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.ठसे सापडले नाहीत ! : हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी लुसी श्वानाला पाचारण करण्यात आले. लुसीने पाठीमागील शेतातून रुग्णालयासमोरच्या रस्त्यापर्यंत माग काढला. घटनास्थळी आलेल्या ठसे तज्ज्ञांनाही हल्लेखोरांचा कोणताही ठसा मिळवण्यात यश आले नाही.