शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ गद्दार म्हणायचे की काय, तुम्हीच ठरवा!

By admin | Updated: May 15, 2016 00:34 IST

उगवत्या सूर्याला नमस्कार याप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसला सोडून भाजपात उडी घेणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणायचे की आणखी काय, हे जनतेने ठरवावे, अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार

सांगवी : उगवत्या सूर्याला नमस्कार याप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसला सोडून भाजपात उडी घेणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणायचे की आणखी काय, हे जनतेने ठरवावे, अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार, शिक्षण मंडळाचे सदस्य आणि नगरसेवक यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सांगवी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शहरात गटातटाचे राजकारण कधी नव्हते. १९९१पासून हे सुरू आहे. गटातटाचे राजकारण चालूच असते. मी कधी गटतट मानणारा नाही. केवळ शहराच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तर संभाजीनगर येथील कार्यक्रमात पवार म्हणाले की, पिंपरी महापालिका पदाधिकारी चुकत असतील, तर मला सांगा. त्यांना जाब विचारतो. नगरसेवक हे विश्वस्त असून, महापालिकेचे मालक नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. मात्र, राष्ट्रवादी नगरसेवकांवर बिनबुडाचे आरोप करू नका. कुणाला कुठले आरोप करायचे, ते करू द्या. प्रत्येकाला मी उत्तर देण्यापेक्षा माझी खुली चौकशी सुरू असून, त्यातून सत्य बाहेर येईल. चौकशी संपल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे, ती येईल. चौकशीत शहानिशा केली जाईल. चूक असेल, त्याला किंमत मोजावी लागेल. चूक नसल्यास जी काही भूमिका असेल, ती पुढे येईल. भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. (वार्ताहर)मोठी किंमत चुकवावी लागलीमागे एका ठिकाणी गावंढळ भाषेत बोललो, त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. ग्रामीण भागात गावरान भाषेत बोललो की, लोकांना लगेच कळते. शहरी भागात मात्र तसे काही नाही. चुकून जरी भाषणात गावंढळ शब्दाचा उल्लेख आला की, लगेच ‘हेडलाइन’ तयार होते. माणूस अनुभवातून शिकतो. मीदेखील बरंच काही शिकलोय, असेही ते म्हणाले.रस्ते खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी कराशहरभर फिरत असताना अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम झाल्याचे पाहायला मिळाले. पदपथही उकरण्यात आले आहेत. ही रस्तेखोदाई विनापरवाना असल्याची माहिती मिळाली. महापालिकेची परवानगी न घेताच कोण दिवसाढवळ्या खोदकाम करत असेल, तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.फरक पडत नाही निवडणुका जवळ आल्या की, अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जात असतात. ठरावीक लोक गेल्यास त्यांच्या मागे जनता जात नसते. आमच्याही पक्षात अनेक जण येणार आहेत. माझ्या विरोधात ज्याला काम करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश आणि शहरातील गटातटाचे राजकारण याबाबत बोलताना व्यक्त केले.