शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यासाठी पाणी देणे बंद करता की आम्ही थांबवू?

By admin | Updated: April 21, 2016 05:18 IST

सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जावा

औरंगाबाद : सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी व्यक्त केली. राज्य सरकार स्वत:हून तसे करणार नसेल तर त्यासाठी आम्हाला अदेश द्यावे लागतील, असेही न्यायालयाने सूचित केले.राज्यभरात नुकताच सराफा व्यापाऱ्यांनी ४१ दिवस बंद पाळला. मात्र, त्यांनी कामगारांना त्यादरम्यानचा पगार दिल्याचे उदाहरण न्यायालयाने दिले व पाणीपुरवठ्याअभावी मद्यनिर्मिती कारखाने बंद राहिले तर तेथील कामगारांनाही पगार दिला जावा, असेही न्यायालयाने सुचविले. राज्य पाणी धोरण २०११ नुसार महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरविण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत केली आहे. त्यावर न्या. एस.एस. शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यातील भीषण दुष्काळामुळे मे महिन्यातील आयपीएल स्पर्धेचे क्रिकेट सामने राज्याबाहेर हलविण्याचा अंतरिम आदेश देताना न्यायालयाच्या मुंबईतील मुख्य पीठाने, आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असे राज्य सरकारला बजावले होते. बुधवारी औरंगाबादेत मद्य कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यासंबंधीच्या सुनावणीतही न्यायालयाने तीच भावना बोलून दाखविली. (प्रतिनिधी)राज्यात १२९ मद्य कारखानेराज्यात एकूण १२९ मद्यनिर्मिती कारखाने असून, त्यापैकी ९९ कारखाने सध्या चालू आहेत. हे कारखाने देशी आणि विदेशी मद्य, बीअर आणि मद्यार्क तयार करतात. यापैकी औरंगाबादला ११ कारखाने असून, अहमदनगरला १०, नागपूरला १३, नांदेडला २, लातूरला २, उस्मानाबादला २, नाशिकला ९, पुण्याला ७, सोलापूरला १५ कारखाने चालू आहेत, अशी माहिती सरकारतर्फे न्यायालयास दिली गेली.सद्य:स्थितीचा अहवालराज्य शासनाने राज्यातील इतर कारखान्यांचा १० टक्के आणि मद्यनिर्मिती कारखान्यांचा २० टक्के पाणीपुरवठा कपात केला असल्याचे निवेदन करून सरकारी वकील गिरासे यांनी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद शहर आणि परिसरातील पाण्याची सद्य:स्थिती काय आहे, याची सविस्तर आकडेवारी देण्यात आली.न्यायालयाचा रोख व व्यक्त केलेली अपेक्षा लक्षात घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वेळ देण्याची विनंती केली. ती मान्य करून खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी दुपारी ठेवली.