शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ पैसे कमावतेय का?

By admin | Updated: September 1, 2014 23:34 IST

बहि:स्थ विद्याथ्र्याचे शुल्क वाढवून त्यांना कुठल्याही सुविधा न देता सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ केवळ पैसे कमावत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणो : बहि:स्थ विद्याथ्र्याचे शुल्क वाढवून त्यांना कुठल्याही सुविधा न देता सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ केवळ पैसे कमावत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांनीच याला विरोध केला असून, एकतर शुल्क कमी करा किंवा सुविधा द्या, अशी मागणी केली आहे. आगामी अधिसभेमध्येही हा विषय मांडला जाणार आहे.
विद्यापीठाने बहि:स्थ प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे पाऊल मागील वर्षी उचलले होते. मात्र, या निर्णयाला विरोध झाला. त्यामुळे विद्यापीठाला माघार घ्यावी लागली. मात्र, बहि:स्थ प्रवेशाच्या शुल्कात चौपट वाढ करून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. शुल्क वाढविताना विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्य तसेच अन्य सुविधा 
उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत. या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असली तरी अद्याप सोयीसुविधांबाबत निर्णय झालेला नाही. यावर काही अधिसभा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्याथ्र्याकडून जादा शुल्क आकारून विद्यापीठ पैसे कमावत आहे का? असा आरोप या सदस्यांनी केला आहे.
अधिसभा सदस्य संतोष ढोरे म्हणाले, की बहि:स्थ प्रवेशासाठी पूर्वी 12क्क् ते 15क्क् रुपये शुल्क घेतले जात होते. आता 65क्क् ते 7क्क्क् रुपयांर्पयत आहे. शुल्क 
वाढवूनही शैक्षणिक साहित्य दिले जात नाही. विद्याथ्र्याकडून पैसे उकळून विद्यापीठ पैसे कमावत आहे. त्यामुळे वाढवलेले शुल्क विद्यापीठाने 
कमी करायला हवे. याबाबत 
आगामी अधिसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला जाईल. 
शुल्क किती वाढवायचे याबाबत काही नियम आहेत; मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. पीएच.डी.चे शुल्कही वाढविले आहे. त्यामुळे 
पैसे गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका अधिसभा 
सदस्य शशिकांत तिकुटे यांनी 
केली. (प्रतिनिधी)
 
दूरशिक्षण कधी? 
बहि:स्थला पर्याय म्हणून दूरशिक्षण योजना सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. या निर्णयावर अद्याप प्रगती झालेली नाही. 
मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. सद्यस्थितीवरून विद्यापीठ दूरशिक्षणासाठी सक्षम नाही, असे दिसते. तसेच जी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, त्या महाविद्यालयांतील विद्याथ्र्याबाबतही विद्यापीठ विचार करीत नाही, अशी नाराजी व्यवस्थापन परिषदेतील एका ज्येष्ठ सदस्यांनी व्यक्त केली. बहि:स्थच्या प्रश्नावरून परिषदेतही एकमत नसल्याचे या सदस्यांनी मान्य केले.
 
विद्याथ्र्याच्या कोंडीचा विद्यापीठाचा प्रयत्न
प्रवेशशुल्क चौपट वाढवून 
केवळ विद्याथ्र्याची कोंडी 
करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. शुल्क वाढविल्याने विद्यार्थी संख्या कमी होईल, असे विद्यापीठाला वाटते. त्यामुळेच 
या विद्याथ्र्याना सुविधा देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.