शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

साई शताब्दीची कामे करा!

By admin | Updated: June 17, 2017 00:40 IST

प्रत्यक्ष कृती कमी व प्रसिद्धी जास्त करणे, संस्थान व्यवस्थापनाला महागात पडलेआहे. केवळ शताब्दीची चर्चा सुरू असल्याच्या कारणावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी

- लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : प्रत्यक्ष कृती कमी व प्रसिद्धी जास्त करणे, संस्थान व्यवस्थापनाला महागात पडलेआहे. केवळ शताब्दीची चर्चा सुरू असल्याच्या कारणावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी निषेधाच्या घोषणा देत गुरुवारी रात्री संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीवर मोर्चा काढून केलेल्या कामाचा हिशोब मागितला़साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या ९० दिवसांवर आला असला तरी घोषणाबाजी वगळता नजरेत भरणारी कोणतीही कामे झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, डॉ़ एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, विजय कोते, निलेश कोते, बाबासाहेब कोते आदींच्या नेतृत्वाखाली शिर्डीकरांनी निषेधाच्या घोषणा देत थेट संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीवर धडक मोर्चा काढला़ व्यवस्थापनाला त्याची कुणकुण लागल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़संतप्त आंदोलकांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्यासह विश्वस्तांना जाब विचारला़ भक्तांचे व शहराचे प्रश्न सोडवता येत नसतील तर विश्वस्तांना शहरबंदी करू, गावबंद, रास्ता रोको सारखी आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. शहराचा विकास झाल्याशिवाय एक पैसाही बाहेर देऊ नये. भाविकांसाठी शिवसृष्टी विनामूल्य ठेवावी, ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशी तंबीच देण्यात आली़ उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा योगिता शेळके, कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदी बैठकीला उपस्थित होते़ शिर्डी रुग्णालयात पुरेशा रुग्णवाहिका नसताना संस्थान राज्यभरात ५०० रुग्णवाहिका वाटते. डॉक्टर व औषधांचा तुटवडा आहे़शिर्डीत देणगीतून सामान गोळा करतात व राज्यात अन्यत्र मुक्तहस्ते देणगी वाटतात, असा आंदोलकांनी आक्षेप घेतला. महाविद्यालय सुरू होवू शकले नाही. संस्थानने सीसीटीव्ही बसविलेले नाहीत. दर्शनबारी, पाणी योजना, स्वच्छतागृहे, रस्त्यांची कामे, दुभाजक व चौकांची सजावट, नगर-मनमाड मार्गावरील दोन्ही बाजूंनी स्वागत कमानी, साईगार्डन, लेसर-शो अशी कोणतीही कामे झाली नसल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले़ शिर्डीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही हावरे यांनी दिली़