शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

जॅकेट-पँट-शर्टवर ‘योग’ नको !

By admin | Updated: June 24, 2016 05:20 IST

योगसाधना’ भारतीय संस्कृतीची ओळख आहे. ‘योग’ कधी, कुठे, कसा आणि कोणत्या पोशाखात करावा, याचेही काही नियम आहेत.

नागपूर : ‘योगसाधना’ भारतीय संस्कृतीची ओळख आहे. ‘योग’ कधी, कुठे, कसा आणि कोणत्या पोशाखात करावा, याचेही काही नियम आहेत. दोन दिवसांपूर्वी देशभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा झाला. राज्याच्या उपराजधानीतील यशवंत स्टेडियम येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सर्व नेतेमंडळींनी मंचावर योगा केला, परंतु हा योग करताना कोणी जॅकेट तर कुणी पँट-शर्ट अशा पोशाखात होते. एवढेच नव्हे तर, प्रत्येकाच्या गळ्यात भगवे दुपट्टे होते. निश्चित हे सर्व चित्र अस्वस्थ करणारे होते.यशवंत स्टेडियम येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शहरातील योगाचार्य रामभाऊ खांडवे, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आ. नागो गाणार व उपमहापौर सतीश होले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. गडकरी व बावनकुळे यांना या कार्यक्रमातून थेट दिल्ली व मुंबईकडे रवाना व्हायचे होते, परंतु मग त्यासाठी योग दिनामागे जो स्वच्छ आणि उदात्त हेतू आहे, तो नष्ट करायचा काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, या वेळी स्वत: योगाचार्य रामभाऊ खांडवे हेसुद्धा मंचावर लाल जॅकेटमध्ये योग करताना दिसून आले. त्यामुळे योगा हा कोणत्याही पोशाखात करता येऊ शकतो का? की त्यासाठी काही ‘ड्रेसकोड’ आणि नियम आहेत, यासंबंधी खांडवे यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)‘योग’ हा एक व्यायाम आहे. यात आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची योग्य पद्घतीने हालचाल झाली पाहिजे. त्यासाठी पुरुषांसाठी कुर्ता-पायजामा आणि महिलांसाठी ट्रॅकसूट असा ‘ड्रेसकोड’ असलाच पाहिजे. कुणी जॅकेट किंवा पँटशर्टवर योगा करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते चुकीचे आहे. - तनू वर्मा, योगाचार्य ‘योग’ कशासाठी?आजच्या आधुनिक सुविधांनी मनुष्याचे जीवन नक्कीच सुकर केले आहे. मात्र, त्याच वेळी घाई, गडबड, गोंधळ, वेग व ताणतणाव, काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला हृदयरोग, मधुमेह व रक्तदाब अशा रोगांनी त्रस्त केले आहे. या सर्वावर उपाय म्हणजे नियमित योगाभ्यास होय. योगामुळे शरीरासोबतच मनही बलवान होते. त्यामुळेच योगाभ्यासाला भारतीय संस्कृतीत उच्च स्थान आहे.