शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चिंता नको, छोटी संमेलने भरवा

By admin | Updated: August 18, 2015 00:56 IST

छोट्या साहित्य संमेलनातील चैतन्य पाहून मराठीविषयीची वाटणारी भीती अनाठायी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठीची चिंता न करता अशा साहित्य संमेलनांची

जळगाव : छोट्या साहित्य संमेलनातील चैतन्य पाहून मराठीविषयीची वाटणारी भीती अनाठायी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठीची चिंता न करता अशा साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे, ती भरवत राहा, असे मत साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी राज्यस्तरीय अकराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. मराठीचे युद्ध आपण हरलो, आता केवळ लढाई सुरू आहे. आज शिक्षणाचे माध्यम बदलले, मराठीवर मळभ आले आहे, असे वाटत असताना हे संमेलन म्हणजे आपण मराठीविषयी चुकीचा समज करून बसलो आहोत, असे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, माया धुप्पड, प्रभा गणोरकर, तारा भवाळकर, भगवान भटकर, संघपती दलुभाऊ जैन आदी मान्यवर संमेलनाला उपस्थित होते. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे देण्यात येणारा अखिल भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार दिब्रिटो यांना देण्यात आला. सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार तारा भवाळकर, तर सूर्योदय सेवा पुरस्कार प्रभा गणोरकर यांना प्रदान करण्यात आला. छोटे संमेलन नवोदितांना आपले साहित्य सादर करण्याचे व्यासपीठ आहे. साहित्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो समाजाचा आरसादेखील असल्याचे माया धुप्पड यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)