शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चिंता नको; पाऊस गाठणार सरासरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:41 IST

कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

पुणे : कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. आॅगस्टमध्येदेखील सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडेल.जूनमध्ये वाट बघायला लावणाºया पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. राज्यात सर्वदूर धो-धो बरसलेल्या आषाढसरींनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु, श्रावण सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारली आहे. अजून दहा दिवस तरी पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काहिसे चिंतेचे ढग जमा झाले असतानाच या सुधारित अंदाजाने दिलासा मिळाला आहे.राज्यात गेल्या नऊ दिवसांत नागपूर आणि भंडारा जिल्हा वगळता औरंगाबाद, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागात सरासरीच्या २० टक्के देखील पाऊस झालेला नाही. कोकण विभागात सर्वाधिक ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील पावसाची ओढ अधिक चिंताजनक आहे. औरंगाबाद विभागाची अ‍ॅगस्टमधील पहिल्या नऊ दिवसाची सरासरी ५७.३ मिलिमीटर असून, त्या तुलनेत केवळ ५.१ (८.९ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागातही केवळ ७.९ (१३ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.