शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशांचे स्वागत नव्हे लूट करा!

By admin | Updated: January 12, 2017 03:51 IST

भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असून, निवडणुकीत ते पैसे वाटायला आले तर खुशाल लुटा, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे

नाशिक : भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असून, निवडणुकीत ते पैसे वाटायला आले तर खुशाल लुटा, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अशाच प्रकारचे विधान केल्यानंतर त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सायंकाळी आंबेडकर यांनी उपरोक्त विधान केल्याने ते सुद्धा अडचणीत येऊ शकतात.नाशिकमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात कुणी पैसे वाटायला आले तर लक्ष्मीचे स्वागत करा असे मी म्हणणार नाही, तर लूट करा असेच म्हणेन. जोपर्यंत लुटणार नाही तोपर्यंत वाटप थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे वाटप रोखण्यासाठीची यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नाही तसेच पोलीस यंत्रणाही पैशांचे वाटप रोखू शकत नाही. याउलट पोलीस हे पैसे वाटप कुठे होते, याची वाटच पाहत असतात. त्यामुळे पोलिसांनीही लुटावे असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला. नेहमीच संयमी आणि अभ्यासू भूमिका मांडणारे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांची ख्याती असताना त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत पैसे लुटण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)