शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दौरे नकोत, पोटाला द्या भाकर !

By admin | Updated: September 20, 2016 03:48 IST

जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

हितेन नाईक,

पालघर- जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना भेटले. जव्हार मोखाड्यात आता लोकांना रोजगाराची अत्यंत गरज असल्याचे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पालघर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी या देखील होत्या.सागर वाघ च्या मृत्यू नंतर तब्बल १५ दिवसांनी सागरच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मयत सागर च्या आईने अक्षरश: हाकलून दिले होते. त्यानंतर या प्रश्नाने सरकारवर चारी बाजूनी हल्लाबोल झाला होता. राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते तातडीने मोखाड्यात एकाच गावात एकाच वेळी भेटीला येण्याची ऐतिहासिक घटना घडली. याबाबत आता श्रमजीवी आंदोलनाच्या आक्र मकतेसोबत कृतीत देखील अधिक आक्र मक झाली आहे. १६ तारखेपासून श्रमजीवी संघटनेचे ३०० युवक कार्यकर्ते मोखाड्यातील गावागावात फिरून तेथील समस्या समजून घेत आहेत. गेल्या ३ दिवसात या युवकांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकांनी सांगितले आम्हाला मंत्र्यांचे दौरे नको, हाताला काम आणि पोटाला भाकर हवी आहे. म्हणूनच श्रमजीवी चे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या युवक पथकाने रोजगार मागणीचे अर्ज देखील भरून घेतले. आणि आज हे अर्ज मोखाडा तहसीलदारांकडे सुपूर्द केले. याच अर्जाची तात्काळ दाखल घेऊन अतितातडीने प्रशासनाने रोहयो ची कामे सुरू करावी याबाबत या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ या बाबत संबंधितांना सूचना केल्या आणि शक्य तितक्या लवकर हि कामे सुरू करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. येथिल आदिवासी, कातकरी बांधवांच्या घरात दोन दिवसाचेही खायला नसल्याची बाब श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणू दिली. यावेळी याभागातील आदीवासी कातकरी कुटुंबाना तात्काळ अंत्योदय योजनेच्या शिधा पत्रिका देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी तहसीलदार आणि पुरवठा विभागाला दिल्या. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, दिनेश पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थितहोते. (वार्ताहर)