शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार नको, पगारात भागवा

By admin | Updated: August 25, 2015 03:19 IST

‘जाओ! पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथ पे यह लिख दिया था !’ दिवार सिनेमातील अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या डायलॉगचा आधार घेत राज्य शासनातील अधिकाऱ्यांना

- यदु जोशी,  मुंबई‘जाओ! पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथ पे यह लिख दिया था !’ दिवार सिनेमातील अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या डायलॉगचा आधार घेत राज्य शासनातील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचे आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघाने केले आहे. ‘भ्रष्टाचार नको, पगारात भागवा’ असा सल्लाही देण्यात आला आहे.एखादा अधिकारी अथवा कर्मचारी भ्रष्टाचारात अडकून तुरुंगात गेला तर सार्वजनिक जीवनात त्याच्या लेकराबाळांना ‘इसका बाप चोर हंै, भ्रष्ट हैं’, असे टोमणे सहन करावे लागतात. त्यामुळे भ्रष्टाचार करताना चारदा विचार करा, असे आवाहन महासंघाने केले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ‘पगारात भागवा’ असे अनोखे अभियान महासंघाने सुरू केले असून, ते आता जिल्ह्याजिल्ह्यात राबविले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आयोजित सभांना कामाच्या वेळेतून जाण्याची मुभा राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली आहे. प्रत्येक सभेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे. जे अधिकारी-कर्मचारी भ्रष्टाचार करताना सापडतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, चौकशीअंती दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात करा, अशी मागणी स्वत: महासंघानेच केली आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना निर्दोष ठरविण्यासाठी महासंघाकडून कोणतीही निवेदने शासन-प्रशासनाकडे दिली जाणार नाहीत, असे महासंघाने स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचारमुक्तीच्या टिप्स..

- वेतन कमी असल्याची तक्रार करू नका.- मोहापासून स्वत:ला आवरा.- जनतेबद्दल आत्मीयता बाळगा.- वरिष्ठांइतकेच जनतेचे प्रशस्तीपत्र महत्त्वाचे माना.- अधिकाऱ्यांनो, काचेच्या केबिनमधून बाहेर या. शेतीच्या बांधावर जाऊन दु:ख समजून घ्या.- शासन-प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी स्वत:हून महासंघाकडे तक्रारी कराव्यात. राज्य सेवेतील ८० टक्के अधिकारी हे प्रामाणिकपणे काम करतात. २० टक्के गडबड करतात. त्यातील पाच टक्के सुधारण्यापलिकडे असतात. उर्वरित १५ टक्क्यांचे प्रबोधन या अभियानाद्वारे केले जाईल.- ग.दि.कुलथे, संस्थापक, राजपत्रित अधिकारी महासंघ.