शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

By admin | Updated: May 11, 2015 05:01 IST

निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

पुणे : राजकारणात काम करत असताना स्वपक्ष व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री ठेवावी. अगदी वर्षांतील ३६४ दिवस मैत्री केली तरी चालेल, पण निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्ताने पवार यांच्या हस्ते काकडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुझुमदार अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, बाळा नांदगावकर, निवेदिता माने आदी उपस्थित होते.राजकीय क्षेत्रात काम करता सर्वपक्षीय मैत्री असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रवगळता काही राज्यात राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. परंतु, पुण्यात वेगवेगळ््या पक्षात राहून गिरीश बापट,अंकुश काकडे व शांतीलाल सुरतवाला (गॅस) यांनी मैत्री जपली. परंतु, निवडणुकीच्या काळात मैत्री ठेवून चालणार नाही. तसे असते, तर महाभारत व रामायण घडले नसते. अर्जुनालाही त्याच्या सग्यासोयऱ्यांबरोबर लढावे लागले होते. त्यामुळे युद्धावेळी समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्ही पुढे शकत नाही, अशी सल्ला पवार यांनी दिला. तसेच, पुण्यातील धोरणात्मक निर्णयावेळी मीही अंकुशचे मार्गदर्शन घेतो,अशी कबुली त्यांनी दिली. (प्रतिनिधी)