शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना काश्मिरातील असहिष्णुता दिसत नाही काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

इंद्रेशकुमारजी यांचा सवाल : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचा समारोप

कोल्हापूर : काश्मीरमध्ये टोकाचा भारतद्वेष केला जातो, राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, ही असहिष्णुता विचारवंत आणि कलाकारांना दिसत नाही काय? असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमारजी यांनी शुक्रवारी येथे केला.ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी बँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘काश्मीर-समस्या आणि समाधान’ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला.इंद्रेशकुमारजी म्हणाले, जगातील सर्वांत मोठे संविधान असणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे, तसेच तात्पुरत्या स्वरुपातील ‘३७० कलम’ लागू असणारेही एकमेव राष्ट्र आहे. हे कलम तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लागू केले. या कलमाने काश्मीरमध्ये भारतीय कायदा व संसदेचा कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई भारत सरकारला करता येत नाही. भारतीय संविधानातील अनेक कायदे अजूनही तेथे लागू होत नसल्याने आपल्याला उघड्या डोळ्यांनी भारतमातेचा व राष्ट्रध्वजाचा अवमान बघावा लागत आहे. याला काय सहिष्णुता म्हणायची काय? ही असहिष्णुता देशातील विचारवंत आणि कलाकारांना का दिसत नाही?ते म्हणाले, ‘३७० कलमा’मुळे आपण आतापर्यंत काय कमावले आणि गमावले? या विषयावर चर्चा करायला देशातील धर्मनिरपेक्ष नेते व कम्युनिस्ट नेते तयार नाहीत. संविधानाची पायमल्ली करून देशाचे तुकडे करायला लावणाऱ्या या कलमाचा कर्करोगासोबत घेऊन आपण आतापर्यंत का राहत आहोत, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मालक जर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू असतील, तर त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या भारत-पाक विभाजनाचे मालकही तेच आहेत. करोडो लोकांच्या बलिदानानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आताही काश्मीरच्या सीमेवर जवान देशासाठी बलिदान देत आहेत. जो देश बलिदान समजून घेत नाही, तो देश भटकत राहतो. या सत्याला देशाने जाणले पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात अनेक युद्धे करून ती जिंकली. आता या युद्धाऐवजी दहशतवादाचा अवलंब होत आहे. या युद्धासाठी होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च हा दहशतवादासाठी होतोय, ही सद्य:स्थिती आहे.यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, हरिश्चंद्र अष्टेकर, महेश धर्माधिकारी, संदीप कुलकर्णी, सुहास तेंडुलकर, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये आदी उपस्थित होते. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)