शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उर्मट वाहनचालकांवर भर रस्त्यात कारवाई नको!

By admin | Updated: January 20, 2016 02:35 IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात.

मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आता आगळी शक्कल लढविली जाणार आहे. घटनास्थळावर त्यांच्यावर कारवाई न करता, केवळ त्यांची माहिती घेऊन सोडले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अशा लोकांवर पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई करावी, अशी सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केली आहे.राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांनी त्या बाबत कर्मचाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वर्दळीच्या ठिकाणी वारंवार वाहनधारकांची पोलिसांबरोबर होत असलेल्या वादावादीचे प्रकार बंद होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यावर त्याला अडविणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांकडून सर्रासपणे त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाते, अशा वेळी वाहनचालक वाद घालत राहिल्याने त्यांच्याजवळ अन्य नागरिकही जमा होतात. त्यामुळे थोड्या वेळात परिसरात मोठी गर्दी होऊन बिकट परिस्थिती निर्माण होते. कधी-कधी त्याचे पर्यवसान जमावाकडून पोलिसांना शिवीगाळ, मारामारी होईपर्यंत जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी हुज्जत घालणाऱ्या संबंधित वाहनचालकावर तातडीने कारवाई न करता, त्यांचे नाव, गाडीचा नंबर, मॉडेल, मोबाइल नंबर आदीबाबतची माहिती नोंदवून घेत त्यांना तेथून जाऊ द्यावे. या प्रकारे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हाप्रमुखांनी पोलिसांनी या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आदेश महासंचालक दीक्षित यांनी अधिकाऱ्यांना बजाविले आहे. (प्रतिनिधी)