शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यास तात्पुरती स्थगिती - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:04 IST

मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे महाविद्यालयांच्या खात्यावर जमा न करता, थेट विद्यार्थ्यांच्याच खात्यावर जमा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, जी.एच. रायसोनी शैक्षणिक संस्था व अन्य काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई : मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे महाविद्यालयांच्या खात्यावर जमा न करता, थेट विद्यार्थ्यांच्याच खात्यावर जमा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, जी.एच. रायसोनी शैक्षणिक संस्था व अन्य काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली.

अनेक महाविद्यालये मागसवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवून, त्यांच्या नावे राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याने, शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाच्या खात्यावर जमा न करता, थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंबंधी राज्य सरकारने ७ आॅगस्ट २०१७ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेला पुण्याच्या काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई वन्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती.

याचिकांनुसार, सरकारने गेली काही वर्षे शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांकडे जमा केली नाही. त्यात भर म्हणून आता ही रक्कम विद्यार्थ्यांच्या नावावर जमा केली जाणार आहे. लाभार्थी विद्यार्थी शिष्यवृत्तीची रक्कम न भरता, मधेच महाविद्यालय सोडून गेला किंवा अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी शुल्क न भरता निघून गेले, तर महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीची रक्कम कोणाकडून वसूल करायची? सरकारकडे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने, प्राध्यापकांना वेतन देणे अशक्य झाले आहे, तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जांचा हप्ताही देणे शक्य नाही.

राज्य सरकारने सारासार विचार न करता, ही अधिसूचना काढल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.सरकारनेच तोडगा काढावा

राज्य सरकारच्या धोरणामुळे किंवा त्यावरील चुकीच्या अंमलबजावणीमुळे सरकार शैक्षणिक संस्थांना अडचणीत आणू शकत नाही. यावर सरकारनेच तोडगा काढावा, असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना संबंधित विभागांच्या प्रधान सचिवांसह अन्य सचिवांची बैठक घेण्याचे निर्देश देत, यावर उपाय काढण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत सरकारला लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यास तात्पुरती स्थगिती दिली.

टॅग्स :Courtन्यायालय