शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांच्याविरोधात खटला सुरू करू नका

By admin | Updated: June 16, 2017 00:40 IST

आदर्श’ घोटाळ््यात खटला भरण्यास राज्यपालांनी दिलेल्या संमतीच्या वैधतेचा फैसला होईपर्यंत या खटल्याचे पुढील कामकाज ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आदर्श’ घोटाळ््यात खटला भरण्यास राज्यपालांनी दिलेल्या संमतीच्या वैधतेचा फैसला होईपर्यंत या खटल्याचे पुढील कामकाज ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने सुरू करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्याने खटल्यात आरोपी करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला.आदर्श घोटाळ््यात चव्हाण यांना आरोपी करून त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १२० बी (गुन्हेगारी स्वरूपाचा कट) आणि कलम ४२० (फसवणूक) याखेरीज भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये खटला दाखल करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत संमती दिली होती. त्याविरुद्ध चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.ही याचिका गुरुवारी न्या. रणजीत मोरे आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे आली तेव्हा चव्हाण यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित शहा यांनी असे निदर्शनास आणले की, ‘एफआयआर’मधून नाव वगळण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याविरुद्ध चव्हाण यांनी केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयात ‘सीबीआय’ने असे आश्वासन दिले होते की, (याचा निर्णय होईपर्यंत) आम्ही विशेष न्यायालयातील खटला पुढे चालविणार नाही. असे असूनही विशेष न्यायालयाने ‘आदर्श’ खटल्याची सुनावणी २१ जून रोजी ठेवली आहे व त्या दिवसापासून खटल्याचे कामकाज चालविले जाईल, असे म्हटले आहे.यावर न्या. मोरे यांनी ‘सीबीआय’चे वकील हितेन वेणेगावकर यांना सांगितले की, राज्यपालांच्या संमतीविरुद्धच्या चव्हाण यांच्या याचिकेवर २१ जूनला सुनावणी घेऊ व निकाल देऊ. तोपर्यंत खटल्याचे कामकाज पुढे चालवू नका, असे खालच्या न्यायालयास जाऊन सांगावे.आता फैसला त्यांच्या विरोधात गेला तरी लगेच खटला सुरु होईल असेही नाही. कारण ‘एफआयआर’मधून त्यांचे नाव काढून टाकण्याचा विषय अद्यापही सर्वोच्च न्यायालयात आहे.नातेवाइकांसह सनदी अधिकाऱ्यांना फ्लॅटसीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशोक चव्हाण यांनी सोसायटीला अतिरिक्त एफएसआय दिला. त्या मोबदल्यात दोन नातेवाइकांना सोसायटीत फ्लॅट दिला. तसेच चव्हाण यांनी कारगील युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठीच्या इमारतीतील ४० टक्के फ्लॅट सनदी अधिकारी व अन्य नागरिकांना देण्यास मंजुरी दिली.