शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

भाषण नको, आधी सातबारा कोरा करा, शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना सुनावले

By admin | Updated: June 4, 2017 20:23 IST

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांना नागपुरात आयोजित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4 - राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना नागपुरात आयोजित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. सिंह यांचे भाषण सुरू असताना गर्दीतील एका शेतकऱ्याने उभे राहून " तुमचे भाषण बंद करा, आधी आमच्या दुधाला ४० रुपये लिटर भाव द्या व सातबारा कोरा करा," असे सुनावले. सिंह यांनी मात्र त्या शेतकऱ्याची साधी दखलही घेतली नाही. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्या शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

 

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यामाने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते डेअरी संयत्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सभागृह शेतकऱ्यांची खचाखच भरले होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. या वेळी राधा मोहन सिंग आपल्या भाषणात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय केले याचा पाढा वाचणे सुरू केले. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृहात एक शेतकरी उभा झाला. आम्हाला तुमचे भाषण नको, दुधाला ४० रुपये लीटरचा भाव जाहीर करा, आमचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करा, अशी मागणी केली. मात्र, त्याच्या मागणीकडे लक्ष देता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

त्या शेतकऱ्यानेही माघार घेतली नाही. शेतकऱ्याने आखणी जोरात आपली मागणी रेटून धरली. सुमारे तीन चे चार मिनीट मंचावरून केंद्रीय कृषी मंत्री तर सभागृहात संबंधित शेतकरी असे दोन भाषण सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शेवटी दोन पोलीस त्या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या जवळपास आले. पण तसे केले तर आणखी गोंधळ वाढेल म्हणून ते माघारी फिरले. शेतकऱ्याचा आवाज सुरूच होता. त्याच्या मागणीला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दिला. शेवटी नितीन गडकरी यांनी संब्धित शेतकऱ्याला इशारा केला व राधा मोहन सिंग यांचे भाषण संपता संपता तो शेतकरी जागेवर बसला. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपले भाषण संपविताना ह्यअसे काही अपवाद वगळले तर उर्वरित शेतकऱ्यांना भेटण्याचे सौभाग्य आपल्याला लाभलेह्ण, असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षपणे मागणी करणाऱ्या त्या शेतकऱ्यावर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मात्र शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकूण घेतले. शेतकरी संपावर राधा मोहन सिंह यांचे मौन  राज्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह शनिवारी रात्रीच नागपुरात आले. रविवारी सायंकाळी ५ पर्यंत ते नागपुरात होते. या दरम्यान प्रसिद्धी माध्ययमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी वारंवार संपर्क केल्यानंतरही सिंग यांनी संपावर एक शब्दही बोलणे टाळणे. कार्यक्रमातही त्यांनी शेतकरी संपाचा साधा उल्लेखही केला नाही.