शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

घोषणाबाजी नको, पायाभूत सुविधा उभारा!

By admin | Updated: July 19, 2016 04:27 IST

मुंबईतील सध्याचे हॉकीचे वास्तव बदलण्यासाठी केवळ आवाहन अथवा घोषणाबाजी करण्यापेक्षा पायाभूत सोयीसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महेश चेमटे,

मुंबई- मुंबईतील सध्याचे हॉकीचे वास्तव बदलण्यासाठी केवळ आवाहन अथवा घोषणाबाजी करण्यापेक्षा पायाभूत सोयीसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खेळाडूंना अधिक अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदाने उपलब्ध कशा प्रकारे करुन देता येतील, त्याचा विचार केल्यास हॉकीची स्थिती निश्चितच बदलता येऊ शकते, असे दिग्गजांचे म्हणणे आहे. आॅलिम्पिकसाठी ३० ते ४० कोटी खर्च करण्याची जशी तरतूद आहे; तशी तरतूद शालेय, महाविद्यालयीन स्तरावर केल्यास हॉकीचे भवितव्य बदलू शकते. खेळाच्या संघटनेला पैसा दिला, की काही कालावधीनंतर ‘भ्रष्टाचार’ नावाचा शब्द हमखास कानी पडतो. हे टाळण्यासाठी प्रत्यक्षात पैसे देण्यापेक्षा हॉकीतील साहित्य कमी किंमतीने उपलब्ध करुन देणे, गरजेचे आहे. तूर्तास क्रीडा साहित्यांना सबसिडी लागू नाही, त्या गोष्टींवर विचार करता येणे शक्य आहे. साहजिकच, साहित्य स्वस्तदराने उपलब्ध करुन दिल्याने खेळाडूंवरील भार कमी होऊन ते खेळण्यास तयार होऊ शकतात, असे १९७५ साली विश्वचषक हॉकी सुवर्णपदक विजेते ओंकार सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मुळात, शाळा-महाविद्यालयीन स्तरावर खेळाडू तयार करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षणाच्या चौथ्या वर्षापासून विद्यार्थ्याच्या हाती हॉकी स्टीक देण्यात यावी. चौथ्या वर्षांपासून सातव्या वर्षांपर्यंत ‘मुलभूत प्रशिक्षण’ देण्यात यावे. शेवटची तीन वर्षात त्या विद्यार्थ्याला अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षणाच्या माध्यमाने खेळातील बारकावे शिकवण्यात यावे. त्यामुळे दहाव्या वर्षी तो विद्यार्थी ‘खेळाडू’ म्हणून नावारुपास येईल. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना खेळातील यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास तो सक्षम होईल. या पद्धतीने खेळाडू तयार करण्यासाठी धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत, आॅलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जोकिम कार्व्हालो यांनी व्यक्त केले.खालसा कॉलेजचे हॉकी प्रशिक्षक आणि फिजिकल डायरेक्टर सैनी हरदीप सिंग म्हणाले, की सध्या शाळा-महाविद्यालयीन तरुणांमध्ये पुन्हा एकदा हॉकीची ‘क्रेझ’ आणण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आंतर विभागीय ‘६ ए साईड’ स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करावे, जेणे करुन त्यांना पाठबळ मिळेल. महाविद्यालीन हॉकीपटूंना जीवनात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या नोकरीस ठेवल्यास हॉकीला ‘अच्छे दिन’ येतील. ‘हॉलंड’ मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश आहे. मात्र तिथे तब्बल ३५० अ‍ॅस्ट्रोटर्फ आहेत. आशियातील ‘सर्वांत श्रीमंत’ महानगर पालिकेकडे स्वत:चे हॉकी मैदान असू नये, ही मोठी शोकांतिका आहे. एकूणच काय तर हॉकीच्या मरणावस्थेत सरकारचे क्रीडा विषयक धोरण, हॉकी संघटना, मुंबई विद्यापीठाला असलेले क्रीडा प्रेम (?) हे सर्व घटक कारणीभूत आहेत. हॉकीवर राजकारण, एकमेंकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करता प्रामाणिकपणे हॉकीच्या सर्वांगिण विकासासाठी काम केल्यास हॉकी जगविणे शक्य आहे. (समाप्त)>‘महाविद्यालयांत हॉकी जगावी’शाळा-महाविद्यालयीन स्तरावर हॉकी पूर्वीसारखा खेळला जात नाही. त्यात शाळा- महाविद्यालयांतील खेळाडूंना दोष देण्यात अर्थ नाही. मुळात ज्या खेळाला मैदानंच उपलब्ध नाही, तिथे खेळाडू निर्माण कसे होणार ? ज्या मुंबईने आॅलिम्पिक विजेते खेळाडू दिले त्या मुंबईवर ‘आज कोणी खेळाडू देता का ?’ अशी भीक मागायची वेळ आली आहे. ख्रिश्चन मिशनरी शाळा वगळता मराठी शाळेत हॉकी खेळली जात नाही. खेळाडू तयार होण्याचे ठिकाण म्हणजे महाविद्यालये. तेथील हॉकीची निराशा बोचणारी आहे. व्यावसायिक हॉकीची परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे. एकेकाळी हॉकीचे नंदनवन समजले जात असलेल्या मुंबई शहरात हॉकी मरणासन्न बनली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही वर्षांत मुंबईत हॉकी खेळली जात होती, असे बोलण्याची वेळ येईल. - रणजित दळवी, ज्येष्ठ हॉकी समीक्षक