शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘बेड रेस्ट नको, सरळ रुग्णालयात दाखलच व्हा!’

By admin | Updated: January 29, 2016 02:26 IST

मुंबईतील पोलिसांनी आता आजारपण व कामाच्या ताणामुळे विश्रांतीसाठी आजारपणाची रजा (सीक लिव्ह) घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पोलिसांना खरोखर

- जमीर काझी,  मुंबईमुंबईतील पोलिसांनी आता आजारपण व कामाच्या ताणामुळे विश्रांतीसाठी आजारपणाची रजा (सीक लिव्ह) घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पोलिसांना खरोखर विश्रांतीची आवश्यकता असल्यास प्रमाणपत्र देण्यापेक्षा, त्यांना थेट रुग्णालयामध्येच दाखल व्हावे लागेल. एवढेच नव्हे, तर पोलिसांबरोबर त्यांना सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई होणार आहे. पोलीस सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांनी त्याबाबतचे आदेश पोलीस शल्य चिकित्सक यांना दिले आहेत. आजारी असल्याचे सांगत, सीक रिपोर्ट करून रजा उपभोगण्याची पोलिसांची पद्धत बंद व्हावी, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.खाकी वर्दीवाल्यांना सण, उत्सवाची पर्वा न करता कर्तव्यावर हजर राहावे लागते. सतत बंदोबस्तात असल्याने अवेळी जेवण, झोप या कारणांमुळे त्यांना विविध आजार जडतात. त्यामुळे पोलीस ठाण्यातून ‘सीक’पास घेऊन रजेवर जातात. रजेचा कालावधी वाढविण्यासाठी पोलीस रुग्णालय, डिस्पेन्सरीमध्ये जाऊन संपूर्ण विश्रांतीबाबतचा दाखला घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला सोपविला जातो. तथापि, अशा प्रकारे मुक्तहस्ते रजा देण्याच्या प्रकाराला सहआयुक्त अनुपकुमार सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. आजारपणाच्या रजेमुळे मुख्यालय, विभाग व पोलीस ठाण्यांमध्ये अपुरे मनुष्यबळ असते. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो, त्यामुळे पोलीस शल्य चिकित्सकांनी संपूर्ण विश्रांतीचे पत्र देणे बंद करावे. आवश्यकता भासल्यास त्याऐवजी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे रजा घेतल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे, जर डॉक्टरांनी विनाकारण रजेची शिफारस केल्यास, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. गैरवापरामुळे निर्णयखोटे सीक रिपोर्ट करून अनेक पोलीस घरातील कामे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजारपणाच्या रजेचा गैरवापराचे प्रमाण वाढल्याने, त्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खरोखर आजारी असणाऱ्याला डॉक्टरांकडून नीट तपासून अ‍ॅडमिट करून घेतले जाईल. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. - अनुपकुमार सिंह, सहआयुक्त, प्रशासन