शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा पायंडा पाडू नका’

By admin | Updated: January 15, 2016 01:06 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली. ही बांधकामे नियमित

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली. ही बांधकामे नियमित करून राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देणार आहे? दंड आकारून बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा पायंडा पाडू नका. राजकीय दबावाखाली येऊन बांधकामे नियमित करू नका. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम होतील, याचा विचार करावा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर टीका केली. नवी मुंबईतील दिघा गावातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयांत दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. राज्य सरकारने गुरुवारच्या सुनावणीवेळी नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याबाबतच्या धोरणाचा मसुदा खंडपीठापुढे सादर केला.या प्रस्तावात ेस्थानिकांच्या परिस्थितीचा दाखला देत, सरकारने राहत्या घरांवर जादा कर आकारून ही घरे नियमित करण्याच्या प्रस्ताव खंडपीठापुढे सादर केला. मात्र या प्रस्तावावर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर धरले. या बांधकामांना नियमित केलेत तर वसई-विरार, पिंपरी-चिंचवड, भिवंडी- निजामपूर येथील रहिवाशीही हिच मागणी करतील. शहर नियोजन विस्कळीत होईल. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याच्या निर्णयावर सरकारने पुनर्विचार करावा,’ असे खंडपीठाने म्हटले.मुंबईवरील ताण कमी होण्यासाठी सरकारने नवी मुंबईची निर्मिती केली. त्यासाठी भूसंपादन केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या भूखंडापैकी १२. ५ टक्के भूंखडही सरकारने दिला. हा सगळा उपद्वयाप कशासाठी केलात? अशाप्रकारे जमिनी घालवण्यासाठी? बेकायदेशीर बांधकामांसाठी? अशा शब्दांत खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले.स्थानिकांची परिस्थिती पाहता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. मात्र त्यासही खंडपीठाने विरोध केला. , असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केलेल्या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा अधिकार सरकारला कसा? कायद्यात तशी तरतुद कुठे आहे? असा सवालही खंडपीठाने केला.या लोकांचे येथेच पुनर्वसन करणे शक्य नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी करण्यात येणे शक्य आहे का? अशीही विचारणा खंडपीठाने केली. या मसुद्यावर पुनर्विचार करून नवा मसुदा २१ जानेवारीला सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.