शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण करु नये - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 21:52 IST

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राजकारण करीत आहेत, मराठा आरक्षणाचे कोणीही राजकारण करु नये

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ - मराठा समाजाच्या आरक्षणावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राजकारण करीत आहेत, मराठा आरक्षणाचे कोणीही राजकारण करु नये. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविषयी झालेल्या सुनावणीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे. मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने मीच न्यायालयातील सुनावणीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती, यामधील एकही शब्द खोटा नाही अशी ठाम भूमिका मांडताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे. 

नारायण राणे यांनी त्यावेळी मतांवर डोळा न ठेवता नीट अभ्यास करुन अहवाल सादर केला असता तर त्यांना आज असे खोटेनाटे आरोप करण्याची वेळ आली नसती. अशा शब्दात श्री.तावडे यांनी राणे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

मराठा आरक्षणविषयी न्यायालयात शासनाने वेळ मागितली अशी चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली हा राणे यांचा दावा खोडून काढताना तावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी न्यायालयातील सुनावणीची वस्तुस्थितीपर खरी माहिती मीच मुख्यमंत्र्यांना दिली. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजु मांडणारे जेष्ठ वकील ॲङ थोरात आणि ॲङ कदम यांनी न्यायालयात सांगितले की, मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचे पुरावे आम्ही गोळा केलेले आहेत, या संदर्भातील 'क्वांटिफिकेशन डाटा' आमच्याकडे तयार आहे.

परंतु नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या जनगणनेनुसारची सविस्तर जातनिहाय माहिती आता उपलब्ध होणार आहे. ही माहिती विश्लेषण स्वरुपात उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पंतप्रधानांकडे विनंती केली आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. न्यायालयात आता प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आमची तयारी आहे. परंतु अधिकची माहिती उपलब्ध झाल्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याची न्यायालयाने आम्हाला संधी द्यावी अशी विनंतीही सरकारच्या वतीने करण्यात आली. याच वेळी काही याचिकाकर्त्यांनी आम्हाला अधिकचा वेळ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाच्या खंडपीठाने या सुनावणीला चार आठवडयाची वेळ दिली असे तावडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष काय घडले याची सविस्तर माहिती राणे यांनी घेतली असती तर बरे झाले असते असा टोलाही तावडे यांनी मारला.