शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीला अव्हेरू नका, पण मराठीची उंची वाढवणे गरजेचे - डॉ. अक्षयकुमार काळे

By admin | Updated: February 3, 2017 21:16 IST

सध्या आपल्यासमोर मराठी भाषा संवर्धनाचा प्रश्न उभा आहे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे आव्हान मराठी

अनिकेत घमंडी/ऑनलाइन लोकमत 
डोंबिवली, दि. 3  - सध्या आपल्यासमोर मराठी भाषा संवर्धनाचा प्रश्न उभा आहे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे आव्हान मराठीसमोर आहे. बदलत्या काळानुसार इंग्रजीला अव्हेरू नका, पण आपल्या मराठीची उंची वाढवणेही गजरेचे आहे. असे मत  90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी व्यक्त केले. 
काळे म्हणाले, "मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय केले, याचा विचार व्हायला हवा. सगळ्यांनी मराठीकडे पाठ फिरवली. इंग्रजीला खैरात वाटली. सध्या आपल्या मराठी शाळा भिकाऱणीसारख्या अवस्थेत आहेत. तर त्या  इंग्रजी शाळा पंचतारांकित रूपात ऊभ्या आहेत. इंग्रजी भाषा अव्हेर करू नका, पण आपल्या भाषेची उंची वाढवणं गरजेचे आहे.
 मराठी भाषा अनिवार्य करा असेही आवाहन त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना केले. "मराठी भाषा अनिवार्य करा, केवळ अनिवार्य नको तर त्याचा गंभीर विचार व्हावा. हिंदी आक्रमणाबाबत ओरड आहे.  आपल्या भाषेत इंग्रजी शब्द आले त्यामुळे ती अधिक कलुषित झाली. आपण मराठी शब्दांचा उल्लेख टाळतो. ती टिकवायची असेल तर शब्द वापर वाढवायला हवे."            
 मराठी लेखक आत्मनिष्ठ नाहीत असा टोलाही संमेलनाध्यक्षांनी लगावला.  ते म्हणतात, लेखकाची व्यापकता समजून घेणे गरजेचे आहे. लेखकाजवळ निकोप विचार दृष्टी असावी. लेखक जगण्याचा पातळीवर साहित्य निर्मन करतात. त्यामुळं ते लिखाण सूक्ष्म होते.  लेखकाच्या लिखाणात शब्द विचार असतात. जीवनदृष्टी हीच वाड्मय दृष्टी होते. लेखकाचे प्रश्न हे जीवणानुभवाचे प्रश्न असतात. ते तो मांडतो. त्यातूनच चिंतन होते. कोणताही श्रेष्ठ लेखक हा जीवनातील अनुभव अनुभूती आणि साक्षात्कार हा येत असतो त्यावरच तो जगतो." असे त्यांनी लेखकाबाबतचे आपले विचार मांडताना सांगितले.  समीक्षणाबाबतही आपली भूमिका मांडली. "मी एक समीक्षक आहे, त्यावरही मी बोलणार आहे. समीक्षक लेखकाला खिंडीत गाठून भय निर्माण करत नाही, पण समीक्षेचे अस्तित्व महत्वाचे आहे, समीक्षेच्या पाठराखणीनेच लेखकाचे भवितव्य घडते." असेही ते म्हणाले.