शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटू नका - विराट कोहली

By admin | Updated: April 22, 2016 17:45 IST

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २२ -  भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.  
 
पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनचे अमित भोसले, आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संस्थापिका डॉ अपर्णा देशमुख या वेळी उपस्थित होत्या. विराट कोहली फाउंडेशन व पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग वृद्धाश्रमाला आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. 
 
यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला, घरातील वडिलधा-या व्यक्तींची काळजी घेणे हे कुटुंबातील सदस्यांचे व समाजाचे देखील कर्तव्य आहे. मात्र अनेकजण या वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटतात. असे करणे चुकीचे आहे. 
 
डॉ. अपर्णा देशमुख यांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात नातलगांनी दूर सारलेल्या ५७ वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांची संपूर्ण व्यवस्था या वृद्धाश्रमात करण्यात आलेली आहे. ही संस्था २०१० साली सुरू झालेली असून कोणत्याही सरकारी अथवा संस्थेच्या मदतीशिवाय सुरू आहे. डॉ. अपर्णा यांच्या कमाईतूनच या संस्थेचा सर्व खर्च उचलला जातो. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व सुरेंद्र मोहिते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.