शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’विषयी गैरसमज नको!

By admin | Updated: May 18, 2017 03:26 IST

रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट (रेरा) लागू झाल्यापासून ग्राहक आणि विकासक यांच्यामधील संभ्रम वाढला आहे. या कायद्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने

- डॉ. मनोहर कामतरिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट (रेरा) लागू झाल्यापासून ग्राहक आणि विकासक यांच्यामधील संभ्रम वाढला आहे. या कायद्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने विकासक याचा फायदा उठवत आहेत. ग्राहकांनी ‘रेरा’विषयी गैरसमज करून घेतल्यास त्याविषयी नकारात्मकता वाढत जाऊन ग्राहकांचे नुकसान होणार. त्यामुळे ‘रेरा’चा प्रसार व्हावा, यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत घरांच्या, जमिनींच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामध्ये अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते; पण या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी ‘रेरा’ कायदा आणला आहे; पण या कायद्याविषयी जनसामान्यांना फक्त प्रसिद्धी माध्यामांतर्फेच माहिती मिळाली आहे. यातही फक्त हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सकारात्मक तरतुदींना प्रसिद्धी मिळाली आहे. या व्यतिरिक्त कायद्याला मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मकतेकडे झुकणारी आहे. ‘रेरा’ लागू झाल्यानंतर जागांची नोंदणी केल्यास तुमचे नुकसान होईल. त्यामुळे ‘बॅक डेटेड’ नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विकासकांमुळे ग्राहक हे पाऊल उचलत आहेत. अशापद्धतीने अवैध काम करणे चुकीचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशी घरांची नोंदणी करणे टाळावे. विकासक ‘रेरा’ कायद्याची भीती दाखवत असल्यास त्याच्याकडे पुरावे मागावेत. विकासक सांगत आहे म्हणून नोंदणी करू नये.‘रेरा’ कायदा लागू झाल्यास आमची कंपनी डुबली, तर तुमचे पैसेही बुडतील ही भीती ग्राहकांना घातली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक घाबरले आहेत; पण अशा प्रकारची तरतूद या कायद्यात नाही. वेळच्या वेळी हफ्ता न भरल्यास ग्राहकांचे पैसे जप्त केले जाणार आहेत. कायद्याविषयीची संपूर्ण माहिती सामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याने याचा फायदा विकासक उचलत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सरकारने कायदा अमलात आणला; पण सामान्यांसाठीदेखील हा कायदा असल्याने त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम आखले पाहिजेत. चर्चासत्रांचे आयोजन करायला हवे. माहितीपुस्तिका काढल्यास त्याचा अधिक फायदा होईल.