शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे यंत्रणाच नापास

By admin | Updated: July 14, 2014 03:42 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला.

सुशांत मोरे, मुंबईदिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला आहे. या अहवालात रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास आणि अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अपघातात २२ प्रवासी ठार तर शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्यानेच झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वेने वर्तविला आहे. त्याबाबतचा रेल्वेच्या आरडीएसओकडून अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून अपघाताची चौकशी केली जात होती. अपघात नेमका कसा झाला, त्याचे मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे; तर अपघातग्रस्त ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात होते. त्यामुळे या बाजूदेखील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पडताळून पाहिल्या जात होत्या. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून एक आठवड्यापूर्वीच या अपघाताचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात त्यांनी रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास झाल्याचे नमूद केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मुळात यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोगीबरोबरच रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीही बरोबर झालेली नव्हती.