शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पेशाला गालबोट नको!

By admin | Updated: October 9, 2016 00:19 IST

औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही.

मुंबई : औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही. प्रत्येकाच्या मागण्या असतात. त्यावर चर्चा करता आली असती. मात्र ज्या पद्धतीने शिक्षकांच्या आंदोलनात शिवीगाळ, नारेबाजी आणि दगडफेक झाली, त्याचे समर्थन करता येणार नाही. आजही समाजात शिक्षकाचे स्थान वरचे समजले जाते. शिक्षकांच्या उच्च दर्जाला गालबोट लागेल असे प्रकार घडता कामा नयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक आंदोलनातील अपप्रकारांवर नाराजी व्यक्त केली. शनिवारी, नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहुल नार्वेकर यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी राज्यातील १०९ शिक्षकांना २०१५-१६ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, १५ वर्षांपासूनची शिक्षकांची मागणी विनोद तावडे यांनी पूर्ण केली. २० टक्के अनुदान देताना घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याचे कोणाला वाटल्यास त्याचा फेरविचार करता आला असता. मात्र आंदोलनाच्या निमित्ताने जो व्यवहार पाहायला मिळाला त्याचे समर्थन करता येणार नाही. गोंधळ घालणारे शिक्षक असूच शकत नाहीत. काही संस्थाचालकांनी आंदोलनात बाहेरची माणसे घुसविली असण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांचे समाजात जे स्थान आहे, त्याला कमीपणा आणता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. सलग १० वर्षे शिक्षणात तेराव्या आणि चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने अवघ्या एका वर्षात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ‘लर्निंग आऊटकम’मध्ये १० टक्क्यांनी सुधारणी झाली. तब्बल १८ हजार शाळा या १०० टक्के लर्निंग आऊटकमवाल्या झाल्या आहेत. न भूतो न भविष्यति असे हे यश शिक्षण विभागाने अवघ्या एका वर्षात मिळविल्याचे सांगून फडणवीस यांनी शिक्षण विभागाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. आगामी काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, यंदा पुरस्कारासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला काही जणांनी या पद्धतीवर टीका केली. मात्र, ज्यांना स्वत:च्या कर्तृत्वावर पुरस्कार मिळेल असा विश्वास होता त्या सर्वांनी याचे स्वागत केले. आॅनलाइन पद्धतीमुळे शिफारसींच्या आधारे होणारी निवड बंद झाली. त्यामुळे इथे जे १०९ आदर्श शिक्षक बसले आहेत ते सारे प्रयोगशील शिक्षक असल्याची भावना तावडे यांनी व्यक्त केली. जागतिक दर्जाची शिक्षणप्रणाली राज्यात आणण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या वर्षात काही शिक्षक स्वखर्चाने शिक्षणातील जागतिक प्रयोग पाहून येणार आहेत. मात्र ज्यांना असा प्रवास शक्य नाही त्या सर्वांसाठी आदर्श जागतिक शिक्षणाबाबतची चित्रफीत आणि सादरीकरण तयार करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१0९ शिक्षकांना पुरस्कारयंदा १०९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात प्राथमिक (३८), माध्यमिक (३९), आदिवासी भागातील प्राथमिक (१९), क्रीडा आणि कला (२), स्काऊट व गाईड (२), अपंग (१) शिक्षकांचा समावेश आहे. तर, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने ८ जणांना सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.