शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा फज्जा उडवू नका

By admin | Updated: May 22, 2017 00:40 IST

पूर्वतयारी व नियोजनाच्या अभावामुळे नोटाबंदीचा फज्जा उडाला. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. जीएसटीची अंमलबजावणी करताना नोटाबंदीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्वतयारी व नियोजनाच्या अभावामुळे नोटाबंदीचा फज्जा उडाला. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. जीएसटीची अंमलबजावणी करताना नोटाबंदीच्या हालअपेष्टांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला सांगितले.वस्तू व सेवा कर ही मुळात काँग्रेस आघाडी सरकारची संकल्पना आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध नाही. पण राज्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनला असल्याने अगोदर कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज होती, असे सांगत कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते. अजुनही त्यांचा अभ्यास सुरू आहे. इतका ‘ढ’ विद्यार्थी आजवर महाराष्ट्राने पाहिला नव्हता, असा टोला विखे यांनी लगावला.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी कमी झाल्यानंतरही केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले नाहीत. उलट राज्य सरकारने अधिभार आणि उत्पादन शुल्क वाढवून लोकांचा खिसा कापला. अलिकडेच मंत्रिमंडळाने वारसा हक्काने दिल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या बक्षीसपत्रावर ४ ते ५ टक्के मुद्रांक शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. ही पाकिटमारीच आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर हे दरोडेखोरांचे सरकार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे हे सरकार नेमके कोणाचे आहे, असा सवालही विखेंनी केला.