शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाला हात लावू देणार नाही!

By admin | Updated: April 4, 2016 03:15 IST

भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे

कमलेश वानखेडे,  नागपूरभारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने ‘एक शपथ... संविधानाला हात लावू देणार नाही!’ अशी आक्रमक ‘थीम’ तयार केली असून ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, असाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.सत्तास्थापनेनंतर भाजपा नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करण्याबाबत केलेले वक्तव्य याचे पडसाद बिहारच्या निवडणूक निकालात उमटले आणि भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आरक्षण लागू राहील, असे स्पष्ट केले. पण हा वाद शांत होत नाही तोच रोहित वेमुला प्रकरण समोर आले. यावरून देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण, राज्यघटना या मुद्यांवर भाजपा, संघ परिवार ‘बॅकफूट’वर गेला असल्याचा अंदाज काँग्रेसने बांधला आहे. ही संधी साधत दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेसने १९९९-२००० साली देशभर संविधान बचाव रॅली काढल्या. या रॅलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक’ केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा तशीच तयारी चालविली आहे.