शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

...आई गर्भात मारू नको! : विद्यार्थ्यांची आर्त हाक

By admin | Updated: June 3, 2016 00:33 IST

काय दोष माझा गं आई गर्भात मारू नको, संस्कृतीचा मूलाधार स्त्रीच करी राष्ट्राचा उद्धार, मुलगा कुळाचा दिवा मुलगी दिव्याची वात, तुझ्याहून थोर जगी दुसरा कुणी नाय

सुवर्णा नवले,  पिंपरीकाय दोष माझा गं आई गर्भात मारू नको, संस्कृतीचा मूलाधार स्त्रीच करी राष्ट्राचा उद्धार, मुलगा कुळाचा दिवा मुलगी दिव्याची वात, तुझ्याहून थोर जगी दुसरा कुणी नाय, असे उद्बोधनपर १५०हून अधिक पोवाडे सादर करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. झोपडपट्टीतील बालशाहिरांनी स्वरचित पोवाडा पथकाची निर्मिती करून समाजात संस्कृती व जनजागृती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई, संगमनेर, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी जाऊन सादर केले आहेत. बालशाहिरांच्या पथकामुळे शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तेथील नागरिकांचा तयार झाला आहे. शाळेच्या पटसंख्येतही सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाढ झाल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र आहेर यांनी सांगितले. डोक्यावर फेटा, हातात शाहिरी डफ, दिमडी आणि टाळ-मृदंगाची साथ जेव्हा डफडीवर पडते, तेव्हा अंगात एक वेगळाच संचार होऊन प्रेक्षकांचे मन पोवाड्यातून हेलावून जाते. त्यामध्ये भाटनगर आणि बौद्धनगर भागातील विजय कापसे, अमर म्हस्के, ओंकार चंदगडकर हे ढोलकीवादक व गायक आहेत, तर कोरस देणारे ऋतीक धार्इंजे, संतोष कापसे, आर्यन वाघमारे, स्वप्निल गायकवाड, स्वप्निल पवार, अर्जुन सनी भाट व थेरगाव शाळेतील अभिषेक क्षीरसागर, आर्य शेवाळे, सूरज कांबळे, गणेश भांडवलकर, प्रथमेश थोरात, हृषीकेश मुतिरावे, नीतिकेश थोरात, रोहन लांघी, अमित शिंदे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.शिवनेरी ते रायगड अशी दर वर्षी पोवाड्यातून पायी जनजागृती करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सूरज कांबळे व आर्य शेवाळे या विद्यार्थ्यांनी अवघ्या १४व्या वर्षी अण्णा भाऊ साठे व शिवरायांवर स्वरचित पोवाडे तयार केले आहेत. तर अर्जुन नेटके हे संगीतकार म्हणून साहाय्य करतात. शाळेत कोणाचाही वाढदिवस असेल, तर तो पोवाडा गाऊनच वाढदिवस सादर केला जातो.सुरुवातीला ढोलकी वाजविण्याची आवड होती. आवडीचा उपयोग पोवाडा वाजविण्यासाठी झाला. शिवाजीमहाराज काय आणि कसे हे आम्ही पोवाड्यातून गाऊन दाखविले आहे. अजूनही खरा इतिहास कोणाला माहिती नाही. जनजागृती करण्याचे काम करीत आहोत. - विजय कापसे, भाटनगर मी आता दहावीला गेलो आहे. चौथीपासून ही कला अंगी बाणवली आहे. पोवाडा सादर करत असतो तेव्हा खूप आनंद वाटतो. पोवाड्याची परंपरा आम्हाला जोपासायची आहे. नागरिकांपर्यंत पोवाड्याच्या माध्यमातून चांगले संदेश व संस्कार पोहोचवायचे आहेत. मी गायक आणि वादकही आहे.- ओंकार चंदगडकर, आंबेडकर कॉलनी, भाटनगरमी आठवीमध्ये आहे. सध्या पोवाडा आणि डफ वाजवतो. यामधून खूप आनंद आणि उत्साह मिळतो. प्रेक्षक आमचे खूप कौतुक करतात. त्यानिमित्त विविध गड-किल्ल्यांवर भटकंती क रता येते. मोठा इतिहास यामधून समोर येतो. सर्वांचा पाठिंबा यासाठी आम्हाला मिळतो. - रोहन लांघी, इंद्रायणीनगर