लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही. मला धनगर समाजापुरते जखडून ठेवू नका. धनगर समाजाने मते दिली असती तर आज मी केंद्रात मंत्री राहिलो असतो, असे दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी येथे सांगितले. शनिवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जानकर येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षण रखडल्याचा आरोप केला. खा. राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोघांना एकत्र आणण्याचे काम आपण नक्कीच करू, असेही जानकर म्हणाले.
मला धनगर समाजापुरता जखडून ठेवू नका - जानकर
By admin | Updated: May 7, 2017 04:31 IST