शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आश्वासन नको, ठोस कृती करा

By admin | Updated: September 10, 2016 03:14 IST

शहरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एमआयडीसी परिसरातील क्रीडा संकुलातील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती.

डोंबिवली : शहरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एमआयडीसी परिसरातील क्रीडा संकुलातील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती. त्याची दखल घेत महापौर व सभागृह नेत्यांनी त्यांना नोकरीत कायम करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यास चार महिने उलटले असून प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. त्यामुळे महापौरांचे केवळ आश्वासन नको कृती करावी, अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.जलतरण तलावात प्रशिक्षक व जीवरक्षक, असे सात कर्मचारी आठ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर नोकरी करत आहेत. कंत्राटदार त्यांना अत्यल्प मानधन देतो. महापालिकेने त्यांना कायम सेवेत घेतलेले नाही. यासंदर्भात १९ जुलैच्या महासभेत सभागृह नेते राजेश मोरे यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यात त्या कर्मचाऱ्यांना चार हजार ५०० ते आठ हजार रुपये मानधन देण्यात येते. सध्याच्या महागाईचा विचार करता ते अपुरे आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापना सूचीवर ही पदे आहेत. त्यानुसार, डोंबिवलीच्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेच्या त्या प्रकल्पात सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती. त्या वेळी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याला सूचक म्हणून मोरे तर अनुमोदक सुधीर बासरे होते. पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर विक्रम तरे यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे. पण, अजूनही त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने सेवेत कायम केलेले नाही. तलाव कंत्राटदाराचा कालावधी लवकरच संपत आहे. नव्याने कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे आताच ही पदे कायम होऊ शकतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.