शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या कामात अडथळा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:43 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. बहुतांशी अडथळे दूर झालेले आहेत. प्रकल्पग्रस्तांचा विरोध ही एकमेव बाब महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी एकांगी भूमिका न घेता विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सिडकोने करण्यात आले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने सिडकोने त्यासंदर्भात अधिक खबरदारी बाळगली आहे. संपादित जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वोच्च असे पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. यात २२.५ टक्के भूखंडाचे वाटप, राहत्या घराच्या बदल्यात अन्य ठिकाणी तिप्पट जागा, नवीन घर बांधणीसाठी खर्च , स्थलांतरणासाठी भाडे देऊ केले आहे. असे असतानाही पदरात अधिक पाडून घेण्याची प्रकल्पग्रस्तांची मानसिकता या प्रकल्पाला अडथळा ठरताना दिसत आहे. त्यामुळे चर्चेने सुटणाऱ्या प्रश्नांसाठी संपूर्ण प्रकल्पालाच वेठीस धरणे योग्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोने नेहमीच लवचिक भूमिका घेतली आहे. काही मागण्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय प्रक्रियेत आहेत. काही अपवादात्मक मागण्या वगळता सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ही वस्तुस्थिती असतानाही प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी नवनवीन मागण्यांचा रेटा लावूनच धरला. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडकोबरोबर असहकाराची भूमिका घेतली आहे. विमानतळ प्रकल्पांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुष्पकनगर येथील विकासकामात खोडा घालण्याचे प्रयास काही घटकांकडून केले जात आहेत. साडेबावीस टक्के भूखंडांचे करारनामे करण्याबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नाही. गावांच्या स्थलांतर प्रक्रियेला प्रतिसाद दिला जात नाही. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत सिडकोने व्यक्त केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित मागण्यांसंदर्भात चर्चेतून तोडगा निघेल, प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत सिडकोच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.जीवनमान उंचावणारा प्रकल्पआंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा नव्हे, तर देशाचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जमिनींना कोट्यवधींचे दर प्राप्त होणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीच्या उत्कर्षाचा मार्ग सुकर होणार आहे. एकूणच देशाच्याच नव्हे, तर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.संपादित जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचे वाटप, राहत्या घराच्या बदल्यात अन्य ठिकाणी तिप्पट जागा, नवीन घरबांधणीसाठी खर्च, स्थलांतरणासाठी भाडे देऊ केले आहे.