शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा शिक्षणात हस्तक्षेप नको!

By admin | Updated: February 8, 2015 01:16 IST

विद्यापीठाचा खरेच विकास झाला काय आणि शिक्षण क्षेत्राविषयी त्यांच्या संकल्पना काय आहेत, याविषयी वेळुकरांशी तेजस वाघमारे यांनी केलेली बातचीत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा कार्यकाळ त्यांच्या निवड प्रक्रियेनेच चर्चेत राहिला. परंतु त्यांच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत नक्कीच नानाविध योजना राबविल्या आहेत. या योजनांमधून विद्यापीठाचा खरेच विकास झाला काय आणि शिक्षण क्षेत्राविषयी त्यांच्या संकल्पना काय आहेत, याविषयी वेळुकरांशी तेजस वाघमारे यांनी केलेली बातचीत.प्रश्न : जुलै महिन्यात तुमचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. नियुक्तीवरून तुम्ही सतत चर्चेत राहिलात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीकडे कसे पाहता ? - कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मी विद्यापीठाशी संबंधित संकल्पना घेऊन आलो होतो. विद्यापीठात येण्यापूर्वी मी महाविद्यालय, राजभवन, उच्च व तंत्रशिक्षण विभागात काम केले होते. तेथून मुंबई विद्यापीठाला पाहिले होते. जागतिक पातळीवर जे काही बदल घडून येत होते. त्या अनुषंगाने मी विद्यापीठाकडे पाहात होतो. जगाच्या पाठीवर शिक्षण क्षेत्रात जे काही बदल होत आहेत, त्या अनुषंगाने माझ्या स्वत:च्या काही कल्पना डोळ््यासमोर होत्या. या कल्पना घेऊनच विद्यापीठात रुजू झालो. पब्लिक इन्स्टिट्यूटमध्ये कामाचा वेग कमी असतो. व्यवस्थेमध्ये कामाचा विशिष्ट असा ढाचा ठरलेला असतो. या ढाच्यामुळे विविध योजना राबविताना आजच्या वेगाने जाता येत नाही. मुंबई विद्यापीठाचा अकावा खूप मोठा आहे. या विद्यापीठाची पाच विद्यापीठे होऊ शकतील. या पाच विद्यापीठांना सांभाळणारे हे विद्यापीठ जोमाने कार्य करीत आहे. ग्रामीण, आदिवासी परिसर, मेट्रो शहर अशी विविधता असणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. गेल्या साडेचार वर्षांत विद्यापीठात बऱ्याच गोष्टी करता आल्या. याचा आनंद आहे. चांगली कामे करीत असताना अडचणीही अनेक होत्या. त्यातून मार्ग काढल्याने विद्यापीठात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे.प्रश्न : साडेचार वर्षांत विद्यापीठात महत्त्वाचे काय बदल घडवून आले ?- कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथम विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळवून दिला. विद्यापीठाचे लेखापरीक्षण गेली अनेक वर्षे झाले नव्हते. ते करण्यास प्रारंभ झाला़ त्याचे काम प्रगतिपथावर असून ते पुढील दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल. परीक्षा पद्धतीत बदल केले. बार कोड आणि ओएमआर पद्धत आणली़ सुरुवातीला या योजनेला विरोध झाला. मात्र याचे महत्त्व पटल्याने ही योजना सुरळीत सुरू आहे. पेपरफुटी टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका आॅनलाइन पाठविण्यास सुरुवात केली. इंजिनीअरिंगच्या पेपरचे आॅन स्क्रीन असेसमेंट सुरू झाले. तसेच इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आॅनलाइन पाहता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांना तपासलेला पेपर पाहता येत आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत २३ नवीन इमारती उभारल्या आहेत. तसेच ५५ नवीन कोर्सेस सुरू केले आहेत. श्रेयांक व श्रेणी पद्धत सुरू झाली आहे. संस्थांना स्वायतत्ता देण्यास प्रारंभ केला असून, आतापर्यंत ८ संस्थांना स्वायत्ता देण्यात आली आहे. युथ पॉलिसी तयार केली असून, ती मान्यतेसाठी शासन दरबारी पाठविण्यात आली आहे. परदेशी विद्यापीठांबरोबर करार केले, कम्युनिटी महाविद्यालये सुरू केली आहेत. या सर्व बाबींमुळे विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे. माझ्या वादाकडे न जाता मला जे करायचे आहे त्याकडे लक्ष दिले. त्यामुळे विद्यापीठाचा विकास झाला आहे.प्रश्न : शिक्षणामधील राजकारणाकडे कसे पाहता ?- राजकारणामध्ये शिक्षण आवश्यक आहे. पण शिक्षणामध्ये राजकारण नको, हे मी वारंवार सांगत आलो आहे. यामध्ये आपला अधिक वेळ जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण ते कधी थांबणार, हे कुणीही सांगू शकणार नाही. शिक्षणामधील राजकारण हे शिक्षणासाठी योग्य नाही.प्रश्न : विद्यापीठाचा महाविद्यालयांवर अंकुश नाही, विद्यार्थ्यांकडून डोनेशन उकळले जाते; यावर तोडगा काय?- महाविद्यालयीन प्रवेशासाठी डोनेशन देणार नाही, असे लोकांनी ठरवले पाहिजे. मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये सुरुवातीला खूप डोनेशन घेत होते. परंतु नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने आता मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो. त्यामुळे मॅनेजमेंटमधील डोनेशन थांबले आहे. तासगावकर महाविद्यालयाचा प्रश्न विद्यापीठ योग्य रीतीने हाताळत आहे. हा सोशल विषय आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. व्यवस्थापनाकडे शिक्षक व शिक्षकेतरांना पगार देण्यास पैसे नसतील, तर यामध्ये नुकसान विद्यार्थ्यांचे होते. त्यामुळे विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ संबंधित महाविद्यालयाची स्वायतत्ता रद्द करू शकते. संलग्नता रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे सहकारी बँका ताब्यात घेण्यात येतात, तसेच महाविद्यालयेही ताब्यात घेता आली पाहिजेत.प्रश्न : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कसे कमी करता येईल ?- विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्यासाठी टॅब आणि लाइट वेटची पुस्तके छापणे हा उत्तम पर्याय आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून विद्यार्थ्यांना टॅब देता येईल. टॅबमध्ये आवश्यक पुस्तके अपलोड करून दिल्यास विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होईल. तसेच पुस्तके छापण्यासाठी लाइट वेटची पाने वापरल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल.प्रश्न : कुलगुरूंची निवड प्रक्रिया आणि त्यामधील राजकारण याकडे तुम्ही कसे पाहता ?- मी राज्यपाल कार्यालयात उच्च शिक्षणाचे काम पाहिले आहे. कुलगुरू निवडीत राजकारण होत नाही. कुलगुरू पदाची मुलाखत झाल्यानंतर दहा मिनिटांत राज्यपाल त्यांच्या निवडीवर सही करतात. निवड समितीमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर असतात. कुलगुरू पदासाठी ज्याची निवड झाली नाही तो आरोप करतो. निवड समितीमध्ये असलेल्या आयआयटी, आयआयएममधील व्यक्तींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कुलगुरू निवडीबाबत जी काही चर्चा होते, ती खरी नाही.प्रश्न : कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हातून काही राहिलं, अशी कोणती खंत आहे का?१०० टक्के गोष्टी पूर्ण करू शकत नाही. ओपन रिसोर्समध्ये जगाच्या पाठीवर अनेक विद्यापीठे पुढे आली आहेत. मुंबई विद्यापीठाचे नावही जगाच्या पाठीवर घेतले जावे, ही माझी इच्छा राहून गेली.प्रश्न : शिक्षण क्षेत्राचा कल कसा बदलत आहे?- विज्ञान क्षेत्राकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. भविष्यात विद्यार्थी इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश न घेता इफोर्मेटिक, जीनो, जेनिटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, ह्युमन रिसोर्स अशा नवीन विषयांकडे वळतील. विज्ञान विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल हळूहळू वाढत आहे. एकेकाळी मॅनेजमेंटला प्रवेश मिळत नसे, परंतु आता मॅनेजमेंटमध्ये जागा रिक्त राहू लागल्या आहेत. काही कालावधीनंतर एक चक्र येते. त्यानुसार सध्या विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.प्रश्न : मराठी भाषेविषयी आपले काय मत आहे?- आताची पिढी अ‍ॅट्रॅक्टिव्ह आहे. मराठीमध्ये खूप काही करण्यासारखे आहे. मराठी भाषेला पुढे घेऊन जाण्यासाठी तिला अ‍ॅट्रॅक्टिव्ह करावं लागेल. मला मराठीबद्दल प्रेम आहे. पण भाषा अधिक अ‍ॅट्रॅक्टिव्ह केली पाहिजे. आता बीए अ‍ॅट्रॅक्टिव्ह केल्याने विद्यार्थी मराठीकडे अधिक वळू लागले आहेत.