शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

खासगी वाहनांवर ‘स्टिकर’ लावण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 02:38 IST

समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही

जमीर काझी, मुंबईसमाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही. समाजातील इतर घटक व सर्वसामान्य नागरिकांवर त्याद्वारे अप्रत्यक्ष दबाव टाकण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात असल्याचा गृह विभागाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्याचा वापर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम गृह विभागाने दिला आहे.राज्यभरातील ५३ पोलीस घटकांना त्याबाबत योग्य प्रकारे सूचित करण्यात यावे, अशी सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनांवर पोलीस स्टिकर, लोगोच्या वापराबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडून अनेकदा त्याचे उल्लंघन केले जाते. वर्दीचा हा गैरवापर प्रामुख्याने त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या वैयक्तिक वाहनांद्वारे केला जातो. अनेकवेळा नो पार्किंग, हेल्मेट न वापरणे, एकमार्गी वाहतूक (वन वे) असलेल्या मार्गावरील नियमाची पायमल्ली केली जाते़ जणू हा नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी असून आपल्यासाठी तो लागू नाही, असा त्यांचा समज असतो़ त्यासाठी बहुतेक पोलीस हे आपल्या टू-व्हिलर, फोर-व्हिलरवर पोलीस, असे अक्षर लिहिलेले स्टिकर किंवा बोधचिन्ह वाहनांच्या पुढील व पाठीमागील बाजूला लावले जाते. त्याबाबत अनेक वेळा न्यायालयासह मानवी हक्क आयोगाने गृह विभागाचे कान टोचले आहेत. सरकारी वाहनाव्यतिरिक्त स्वत:च्या वाहनांवर असा वापर करणे, बेकायदेशीर आहे़ त्यामुळे समाजातील इतर घटकांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जातो़ यामुळे अशा प्रकारला मनाई करावी, अशा अनेक तक्रारी मुख्यमंत्री व गृह विभागाकडे आहेत. त्यामुळे खासगी वाहनांवर स्टिकर लावण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोणत्याही पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्याने आपल्या खासगी वाहनावर ‘पोलीस’ अशी पाटी लावणे किंवा पोलीस विभागाचे चिन्हा लावणे/चिटकवणे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट केले असून त्याबाबत राज्यभरातील सर्व पोलीस घटकांना सूचना करण्यात यावी, असे पोलीस महासंचालकांना सूचित करण्यात आले आहे.